चिपळूण ःसदनिकेला आग, 6 लाखाची हानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ःसदनिकेला आग, 6 लाखाची हानी
चिपळूण ःसदनिकेला आग, 6 लाखाची हानी

चिपळूण ःसदनिकेला आग, 6 लाखाची हानी

sakal_logo
By

rat२३४१.txt

बातमी क्र. ४१ ( पान ३ )

फोटो - ratchl२३६.jpg
८४८९१
चिपळूण - आगीत जळून खाक झालेले साहित्य

चिपळुणात शॉर्टसर्किटने सदनिकेला आग

भर दुपारची घटना ; सहा लाखांचे नुकसान

चिपळूण, ता. २३ ः शहरातील पागमळा येथील परांजपे स्कीमच्या बी-२ या बिल्डिंगमधील एका सदनिकेत दुपारी अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. उन्हाच्या कडाक्याने तत्काळ आगीने रौद्ररूप धारण केले. सदनिका परिसरातील लोकांनी अग्निशमन बंबाला पाचारण केले. परिसरातील लोकानी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेतून महिला व दोन बालके सुखरूप बचावले. मात्र तासाभराच्या कालावधीत सदनिकेतील बहुतांशी साहित्य, वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेत सुमारे ६ लाखाचे नुकसान झाले आहे.
शहरातील पागमळा येथे परांजपे स्कीम नावाने मोठे रहिवासी संकुल आहे. येथील बी-२ मधील सदनिका ही सई सचिन पेठे यांच्या मालकीची असून त्यामध्ये भाऊसाहेब नलावडे हे गेल्या ३ वर्षापासून भाडे तत्वावर राहत आहेत. आज दुपारी १२ वाजता अचानक बेडरूम मधून धुराचे लोळ निघू लागले आणि काही क्षणातच आग भडकली. आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ नगरपालिकेला कल्पना दिली. पालिकेचा अग्नीशामक बंब दाखल झाला. आग विझविण्यासाठी परिसरातील अनेकजण मदतीसाठी धावले. बेडरूममधील कपडे तसेच साहित्याने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत बेडरूम मधील कपड्यांसह अन्य सर्व साहित्य जळून खाक झाले होते. घरात आग लागल्याचे निदर्शनास येताच घरातील महिला व मुलांनी बाहेर धाव घेतली होती. परांजपे स्कीम मध्ये यापुर्वीच अग्नीशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक मजल्यावर अग्नीशमन सिलेंडर देखील ठेवले आहेत. मात्र अग्नीशमनची यंत्रणा गेल्या काही वर्षापासून बंद आहे. शहरातील फार कमी संकुलामध्ये अशी यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. अग्नीशमन यंत्रणा कार्यरत असती तर नुकसान कमी होण्यास मदत झाली असती. तरिही अग्नीशमन सिलेंडरचा वापर करून आग विझवण्याचे प्रयत्न झाले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा झाला असून त्यामध्ये ५ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमुद केले आहे.