Mon, March 27, 2023

नांदगावात रविवारी वैश्य वधू-वर मेळावा
नांदगावात रविवारी वैश्य वधू-वर मेळावा
Published on : 23 February 2023, 2:26 am
नांदगावात रविवारी
वैश्य वधू-वर मेळावा
नांदगाव, ता. २३ ः येथे वैश्यवाणी समाजाच्या वतीने रविवारी (ता. २६) सकाळी १० वाजता वैश्यवाणी वधू-वर परस्पर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी आमदार राजन तेली, माजी उपाध्यक्ष पर्यटन विकास मंडळ संदेश पारकर, वैश्यवाणी समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदेश पारकर, पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेविका मेघा गांगण, गुरुमठ समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष ॲड. दीपक अंधारी, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर आदी उपस्थित राहणार आहेत.