ओरोसला आज वधू-वर मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओरोसला आज वधू-वर मेळावा
ओरोसला आज वधू-वर मेळावा

ओरोसला आज वधू-वर मेळावा

sakal_logo
By

ओरोसला आज वधू-वर मेळावा
कुडाळः लोककल्याण सामाजिक संस्था सिंधुदुर्गच्या वतीने उद्या (ता. 24) सकाळी 9 ते 1 या वेळेत वधू-वरांचा मोफत एक दिवशीय मेळावा ओरोस जैतापकर कॉलनी शिवनेरी बिल्डिंग डि विंग सेकंड फ्लोर, ओरोस येथे आयोजित केला आहे. वधू आणि वर, घटस्फोटीत वधू आणि वर, विधवा, विधूर, अपंग वधू आणि वर लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. वधू-वर मेळावा सर्व जातींसाठी असून गोवा व सिंधुदुर्गमधील वधू-वरांनी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
................
शिवजयंतीनिमित्त पुस्तक वाटप
मालवण : शिवजयंतीनिमित्त तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या वतीने ''शिवाजी कोण होता?'' या पुस्तकाच्या दोनशे प्रतींचे येथील टोपीवाला हायस्कूल व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार येणाऱ्या पिढीला समजले पाहिजेत, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे, यासाठी मागील वर्षीपासून विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा संकल्प केला असून त्याच धर्तीवर गोविंद पानसरे लिखित या पुस्तकाचे वाटप केले, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. यावेळी टोपीवाला हायस्कूल व सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
.............