कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी जादा गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण रेल्वे मार्गावर 
होळीसाठी जादा गाड्या
कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी जादा गाड्या

कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी जादा गाड्या

sakal_logo
By

कोकण रेल्वे मार्गावर
होळीसाठी जादा गाड्या

कणकवली,ता.२४ ः कोकणातील होळी सणासाठी कोकण रेल्वे मार्गावर विविध रेल्वे गाड्या धावणार आहेत. यामध्ये एलटीटी ते मडगाव, पुणे ते करमाळी, पनवेल ते करमळी या गाड्यांचा समावेश आहे.
या मार्गावर (गाडी क्र. ०१४५९) एलटीटी ते मडगाव ही गाडी दर रविवारी १२ मार्चपर्यंत धावणार आहे. ही गाडी एलटीटी येथून रात्री सव्वा दहाला सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाला पोहचेल. परतीसाठी दर सोमवारी (गाडी क्र.०१४६०) १३ मार्चपर्यंत सकाळी साडेअकराला मडगाव येथून सुटेल. एटीटीला रात्री पावणेबाराला पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकावर थांबेल. गाडी क्र. ०१४४५ पुणे ते करमाळी विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दर शुक्रवारी १७ मार्चपर्यत सायंकाळी साडेपाचला पुणे येथून सुटेल. सकाळी साडेआठला करमळीला पोहोचेल. परतीसाठी (गाडी क्र. ०१४४६) करमळी ते पुणे ही गाडी दर रविवारी १९ मार्चपर्यंत करमळी येथून सकाळी ९.२० ला सुटेल. पुणे जंक्शनला रात्री साडेअकराला पोहचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्थानकांवर थांबेल.
गाडी क्र. ०१४४८ करमळी ते पनवेल विशेष (साप्ताहिक) गाडी दर शनिवारी १८ मार्चपर्यंत करमळी येथून सकाळी ९.२०ला सुटेल. त्याच दिवशी रात्री सव्वाआठला पनवेलला पोहोचेल. परतीसाठी गाडी क्र. ०१४४७ पनवेल ते करमळी विशेष (साप्ताहिक) गाडी दर शनिवारी १८ मार्चपर्यंत पनवेल येथून रात्री दहाला सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठला करमळीला पोहोचेल. ही गाडी थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकांवर थांबेल. गाड्यांचे बुकिंग २३ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे.