
‘देवगड-खुडी एसटी फेऱ्या सुटीच्या दिवशी सुरू ठेवा’ ‘देवगड-खुडी एसटी फेऱ्या सुटीच्या दिवशी सुरू ठेवा’
84987
देवगड ः येथील आगार व्यवस्थापक नीलेश लाड यांना निवेदन देण्यात आले.
‘देवगड-खुडी एसटी फेऱ्या
सुटीच्या दिवशी सुरू ठेवा’
देवगड, ता. २४ ः देवगड-खुडी-कणकवली या मार्गावर सोडण्यात येणाऱ्या सर्व एसटी प्रवासी फेऱ्या सुटीच्या दिवशीही सुरू ठेवाव्यात, अशी मागणी खुडी सरपंच तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपविभागप्रमुख दीपक कदम यांनी केली. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी आगार व्यवस्थापक नीलेश लाड यांना दिले.
एसटी महामंडळामार्फत देवगड-खुडी-कणकवली या मार्गावर सोडण्यात येणाऱ्या सर्व प्रवासी फेऱ्या रविवार व सुट्टीच्या दिवशी बंद केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत खुडी सरपंच कदम यांच्यासह कृष्णा जोईल, श्रीकांत मल्हार यांनी आगार व्यवस्थापक लाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. लाड यांनी शिष्टमंडळाने केलली विनंती मान्य करून या मार्गावर १ मार्चपासून गाड्या सोडण्यात येतील. परंतु, भारमान न वाढल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता या मार्गावरील गाड्या बंद करण्यात येतील, असे सांगितले असल्याची माहिती श्री. कदम यांनी दिली. या मार्गावर भारमान वाढवण्यासाठी प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. कदम यांनी केले आहे.