
ठाकरे गट विभाग संघटकपदी पी. डी. सावंत यांची निवड
ठाकरे गट विभाग संघटकपदी
पी. डी. सावंत यांची निवड
कुडाळ, ता. २४ ः आमदार वैभव नाईक यांनी पी. डी. सावंत यांची विभाग संघटकपदी नेमणूक झाली. त्यांच्याकडे कुपवडे, घोटगे, सोनवडे, जांभवडे, भरणी या गावांत शिवसेना संघटना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.
भरणी शाखाप्रमुखपदी योगेश घोगळे व भरणी महिला शाखा प्रमुखपदी प्रिया परब यांची निवड केली आहे. कुपवडे आणि भरणी गावात आमदार नाईक यांच्या प्रमुख उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी या निवडी करण्यात आल्या. ठाकरे गट उपतालुका प्रमुखपदी सचिन कदम यांची निवड झाल्याबद्दल सोनवडे येथे झालेल्या बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला. भरणी येथे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख महेश सावंत, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे, दीपक घाडी, गुरु मेस्त्री, भावेश परब, काशीराम घाडी, गणपत घोगळे, योगेश घोगळे, पूजा मेस्त्री, अंकिता परब, प्रकाश परब, गणपत मेस्त्री, प्रकाश वाडेकर, विष्णू घोगळे, उर्मिला परब, अच्युत मेस्त्री, नारायण घाडीगावकर, पांडू पवार, बाबा कसबले आदी. कुपवडे येथे विजय परब, सतीश सावंत, शामसुंदर सावंत, दाजी ढवण, आत्माराम तेली, प्रभाकर ढवण, संतोष ढवण, निलेश ढवण. सोनवडे येथे रुपेश घाडी, काशीराम घाडीगावकर, उत्तम बांदेकर, विनोद घाडीगावकर, भिकाजी घाडीगावकर, सदाशिव गुरव, मोहन घाडी, उत्तम घाडी, शरद घाडी, दीपक घाडीगावकर आदी उपस्थित होते.