
निबंध स्पर्धेत अनुष्का भोसलेचे सुयश
बेहेरे विद्यालयाचे समूहगीत स्पर्धेत सुयश
दाभोळः दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूहगीत स्पर्धेत यश मिळवले आहे. पाडले भंडारवाडा ग्रामस्थांनी शिवजयंतीनिमित्त समूहगीत स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे विद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना पारितोषिक स्वरूपात रोख रुपये 3 हजार 500 व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी धनराज जंजीरकर व शैलेश धोपट यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक डॉ. शशिशेखर शिंदे यांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.
------------
rat21p15.jpg
84979
रत्नागिरीः एनएसएस शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना आयटीआयचे प्राचार्य कोतवडेकर.
-------
आयटीआयचे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात
रत्नागिरी ः येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरीचे निवासी श्रमसंस्कार शिबिर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत नाचणे गावामध्ये आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घाटन सोमवारी नाचणे गावचे सरपंच ऋषिकेश भोंगले यांच्या हस्ते झाले. या वेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरीचे प्राचार्य एस. जी. कोतवडेकर व प्राचार्य पी. एस. शेट्ये यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तर सरपंच भोंगले यांनी मनोगतातून ‘नॉट मी बट यू’ या एनएसएसच्या घोषवाक्याचा अर्थ समजावून सांगितला. शिबिराला संपूर्ण सहकार्य ग्रामपंचायत करेल असे सांगितले. या समारंभाला नाचणेच्या उपसरपंच निलेखा नाईक, शिवानी रेमुळकर, रश्मी कोळंबेकर, सुचिता घडशी ज्येष्ठ नागरिक वसंत झगडे, ग्रामविकास अधिकारी जी. के. खरंबळे व ग्रामपंचायत लिपिक घाग उपस्थित होते. या वेळी माजी कार्यक्रम अधिकारी शेलार यांनी सुद्धा स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी बिबवणेकर, जाधव, पिलणकर, शिंदे, गादीकर, बिर्जे, झारी, पांचाळ तसेच सर्व नियमित निदेशक व तासिका तत्त्वावरील निदेशक व सर्व स्वयंसेवक या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.