राजापूर-शेंबवणेत उभारले शिवरायांचे मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-शेंबवणेत उभारले शिवरायांचे मंदिर
राजापूर-शेंबवणेत उभारले शिवरायांचे मंदिर

राजापूर-शेंबवणेत उभारले शिवरायांचे मंदिर

sakal_logo
By

rat24p33.jpg ः
85038
राजापूरः मंदिरामध्ये बसवण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती.
-----------
शेंबवणेत उभारले शिवरायांचे मंदिर
राजापूर, ता. २४ः तालुक्यातील शेंबवणे येथे इतरही देवदेवतांची देवळे असूनही येथील शिवभक्तांनी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आहे. या मंदिरामध्ये शेंबवणे गावचे वतनदार शिरीष शेंबवणेकर, ग्रामस्थ रमेश कातकर आदींच्या हस्ते नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
या मंदिर उभारणीसाठी शिवभक्त सूरज कातकर, बापू नवलू, अशोक आगटे, रूपेश कातकर, कल्पेश कातकर, मनोज पळसमकर, प्रसाद पळसमकर, प्रशांत पळसमकर, सुरेंद्र पळसमकर, अक्षय नाचणेकर, नितेश कांबळे, गणेश कांबळे, जगन कातकर, प्रणीत कातकर, नीरज आगटे, बाबू आगटे, विशाल कातकर, शैलेश कातकर, रोहित पळसमकर, जयेश कातकर, संदेश कातकर, धनराज कातकर, उद्देश आगटे, सिद्धेश शिंदे, चेंतन शिंदे, प्रमोद आग्रे, बारक्या पिलके आदींनी दिवसरात्र मेहनत घेतली. यानिमित्ताने वास्तव क्रिएशन कलामंचने कन्यादहन हे नाटक सादर केले. या वेळी सरपंच वैष्णवी कुळ्ये, उपसरपंच अनुजा पवार, विश्वनाथ सावंत, मनोज राठोड, विष्णू सप्रे, जयवंत राठोड, हरिश्‍चंद्र आगटे, शिवराम मांडवकर, जनार्दन कातकर, अनंत सावंत, नामदेव फळसकर, मुन्ना कुळये उपस्थित होते.