Mon, March 20, 2023

पिंगुळीत मंगळवारी
धार्मिक कार्यक्रम
पिंगुळीत मंगळवारी धार्मिक कार्यक्रम
Published on : 24 February 2023, 12:16 pm
पिंगुळीत मंगळवारी
धार्मिक कार्यक्रम
कुडाळ ः पिंगुळी-शेटकरवाडीतील भवानी मातेचा तैवार्षिक जागरण गोंधळ मंगळवारी (ता.२८) आयोजित केला आहे. सकाळपासून देवीला गाऱ्हाणे घालणे, नवस बोलणे-फेडणे, दुपारी पूर्ण वाडीत देवीचा जोगवा फिरवणे, सायंकाळी गोंधळाची मांड भरणी, नंतर देवीचा उदो उदो करून देवीला नैवेद्य दाखवून महाप्रसाद आणि रात्री गोंधळी लोकांची कथा असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन सावंत परिवार यांच्यावतीने केले आहे.