
वाफोलीतील रस्त्याचे काम सुरू करा ः संजय आईर
85077
संजय आईर
वाफोलीतील रस्त्याचे काम
सुरू करा ः संजय आईर
बांदा, ता. २४ ः दाणोली रस्त्यावरील वाफोली धरणाजवळ नव्याने बांधकाम केलेल्या पुलाच्या जोडरस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे, अन्यथा ८ मार्चला पुलाच्या मधोमध बसून आंदोलन करू, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी दिला. त्यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, वाफोली धरणाजवळ नाबार्ड योजनेंतर्गत ७५ लाख रुपये खर्चून पूल उभारण्यात आले आहे. गतवर्षी मार्च अखेरीस पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. पुलाच्या जोडरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम अंदाजपत्रकात समाविष्ट असूनही ठेकेदार काम करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. यामुळे रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहनचालकांना गाडी चालविताना कसरत करावी लागत आहे. याठिकाणी छोटे मोठे अपघात झाले असून खड्डेमय रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आपल्या कार्यालयाकडून ठेकेदाराला येत्या आठ दिवसात उर्वरित काम पूर्ण करण्यासंदर्भात तात्काळ सूचना द्याव्यात, अन्यथा ८ मार्चला याठिकाणी बसून उग्र आंदोलन छेडू.