सावंतवाडीत दोन गटांत हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत दोन गटांत हाणामारी
सावंतवाडीत दोन गटांत हाणामारी

सावंतवाडीत दोन गटांत हाणामारी

sakal_logo
By

सावंतवाडीत दोन गटांत हाणामारी

पुर्ववैमनस्यातून प्रकार; तिघांवर अदखलपात्र गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः पुर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ मारामारी झाल्याचा प्रकार काल (ता.२३) रात्री साडेदहाच्या सुमारास येथील तीन मुशी परिसरात घडला. यात दोघेजण जखमी झाले. यावेळी घटनास्थळावर बघ्यांनी मोठी गर्दी होती. मात्र, पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन हा जमाव पांगवला. या प्रकरणी दोन्ही गटातील जखमींनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकुण सहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.
याबाबत यशवंत चंद्रकांत कारीवडेकर (वय २५ रा. जुस्तीन नगर) याने दिलेल्या तक्रारीनुसार, जयदीप दिनानाथ बल्लाळ (वय २१), अल्फाज गजबार मुल्ला (वय २२, दोघेही रा. सालईवाडा) या दोघांवर अदलखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारीवडेकर याने दिलेल्या तक्रारीनुसार कारीवडेकर व मुल्ला व बल्लाळ यांच्यात पुर्वीचे वाद आहेत. यावेळी दोघांनी मिळून कोणतेही कारण नसताना मारहाण केली, अशी तक्रार दिली आहे. तर दुसरी तक्रार अल्फाज मुल्ला याने दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार यशवंत कारीवडेकर याच्यावर अदलखात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार हाणामारी घडलेल्या जागी यातील कारीवडेकर हा आपल्या सहकारी गौतम वाडकर यास मारहाण करीत असल्याने आपण सोडविण्यासाठी गेलो असता आपल्याला मारहाण करण्यात आली, अशी नोंद केल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले.