
बांद्यातील गवळीटेम्ब येथे रस्त्याची दुरवस्था
85129
सावंतवाडी ः येथे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रशांत बांदेकर व गुरुदत्त कल्याणकर.
बांद्यातील गवळीटेम्ब
येथे रस्त्याची दुरवस्था
प्रशांत बांदेकर; अपघाताचा धोका
बांदा, ता.२४ ः शहरातील गवळीटेम्ब येथील पडते घर ते पाटकर बाग या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी, अशी मागणी येथील प्रभाग क्रमांक ३ चे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर वाडीतील १५ ग्रामस्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने रस्ता वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनला आहे. नियमानुसार या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे होते. मात्र ते न झाल्याने रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. याठिकाणी वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना देखील त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. यावेळी त्यांच्यासोबत येथील ग्रामस्थ गुरुदत्त कल्याणकर उपस्थित होते. बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी ग्रामस्थ्यांच्या मागणीचा विचार करून पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले.