
परशुराम चलवाडींचा सावंतवाडीत सत्कार
85204
सावंतवाडी ः परशुराम चलवाडी यांच्या सत्कार प्रसंगी उदय अळवणी, दिलीप भालेकर, संजय पेडणेकर आदी.
परशुराम चलवाडींचा सावंतवाडीत सत्कार
सावंतवाडी ः भटवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात तेथील नागरिकांच्या मागणीनुसार सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले. त्यांनी केलेल्या कामाबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. या मंदिराचा १४ वा वर्धापनदिन काल (ता. २४) उत्साहात पार पडला. याचे औचित्य साधून श्री परशुराम चलवाडी यांचे मंदिराच्या केलेल्या कामाबद्दल कौतुक करून श्री देव विठ्ठल मंदिर, श्री देव दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टमार्फत मंदिरातील पुरोहित उदय अळवणी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना चलवाडी यांनी भविष्यातही भडवाडीतील नागरिकांच्या सोबत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, शेखर सुभेदार, आबा कशाळीकर, सुनील सावंत, संजय पेडणेकर आदींसह अन्य ज्येष्ठ मंडळी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
...............
महिलादिनी विविध उपक्रम
कुडाळ ः जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला सेलच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विविध प्रकारच्या स्तुत्य उपक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. २६) पिंगुळी येथील जिव्हाळा सेवाश्रम येथे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर, ६ मार्चला खुल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ येथे सकाळी १० ते १२ या वेळेत केले आहे. ८ मार्चला होळी उत्सवानिमित्त सकाळी जीवदान विशेष शाळा, झाराप येथे विशेष कार्यक्रम होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग सहसमन्वयक पदाधिकारी डॉ. प्रगती शेटकर, डॉ. शरावती शेट्टी, डॉ. चैताली प्रभू यांनी केले आहे.