
रत्नागिरीत श्रीराम मंदिर येथे 1 मार्चला महिलांचा ‘उत्सव’ मेळावा
rat२५८.txt
बातमी क्र. ८ (पान २ साठी)
रत्नागिरीत बुधवारी उत्सव मेळावा
श्रीराम मंदिरात आयोजन ; सासू-सून धमाल जोडीचीही स्पर्धा
रत्नागिरी, ता. २५ ः येथील श्रीराम मंदिर संस्थेच्यावतीने महिलांसाठी अनेक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ मार्चला दुपारी ३ ते ६ या वेळेत श्रीराम मंदिराच्या सभागृहामध्ये महिलांचा जिल्हास्तरीय ‘उत्सव’ मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात सर्व भगिनी, युवती व १० वर्षापर्यंतच्या मुली सहभागी होऊ शकतात. त्यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे, सासू-सून परफेक्ट मॅचिंग स्पर्धा, उखाणे स्पर्धा (वेळ १ मिनिट), फनी गेम्स- कप जगल, रांगोळी स्पर्धा, कॅन्डल लाईट स्पर्धा, स्ट्रॉ-गेम इत्यादी. सासू-सून परफेक्ट मॅचिंग स्पर्धेसाठी गुणदान खालील निकषावर होणार आहे. मॅचिंग ५ गुण, कॉम्पिटन्सी टेस्ट (सुसंगता स्पर्धा) ५ गुण, उत्स्फूर्त संभाषण (एखादा विषय दिला जाईल), जनरल नॉलेजचे ५ प्रश्न विचारले जातील. परफेक्ट मॅचिंग स्पर्धेसोबतच सासू-सून धमाल जोडी ही स्पर्धादेखील घेतली जाईल. त्याचप्रमाणे ''मीच माझ्या रूपाची राणी गं'' ही स्पर्धादेखील घेण्यात येणार असून, महिला वैयक्तिकरित्या या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. १० वर्षांपर्यंत सहभागी होणाऱ्या मुलींसाठी विशेष बक्षिस दिले जाईल. स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली आहे.
या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांमधून हिरकणी निवडली जाईल. त्यासाठी जनरल नॉलेजचे ५ प्रश्न विचारले जातील. स्पर्धेतील महिलांचा विविध बक्षिसांनी सन्मान करण्यात येणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. ज्यामध्ये भरजरी पैठणी आणि अन्य बक्षिसांचा समावेश असेल. या स्पर्धा सर्व महिलांसाठी खुल्या आहेत.
--