
व्हरेनियम क्लाऊड कंपनीकडून सावंतवा़डीसाठी ''ई-कार्ट गाडी
85185
सावंतवाडी ः ई-कार्ट गाडी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे सुपूर्द करताना कंपनीचे संचालक विनायक जाधव. शेजारी इतर.
व्हरेनियम क्लाऊड कंपनीकडून
सावंतवा़डीसाठी ''ई-कार्ट गाडी
सावंतवाडी ः व्हरेनियम क्लाऊड या कंपनीच्या माध्यमातून येथील पालिकेला ‘ई-कार्ट’ गाडी उपलब्ध करून देण्यात आली. ही गाडी शहरातील अंतर्गत भागासह अडचणीच्या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी वापरात येणार आहे. कंपनीचे संचालक विनायक जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ही गाडी पालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर, आरोग्य निरीक्षक रसिका नाडकर्णी, पांडुरंग नाटेकर, दीपक म्हापसेकर, विजय बांदेकर आदी उपस्थित होते. सी.एस.आर. फंडातून ही गाडी उपलब्ध करून दिली आहे. याबाबतची मागणी सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून व्हरेनियम कंपनीकडे केली होती, असे नाडकर्णी यांनी सांगितले. या गाडीच्या माध्यमातून शहरातील अंतर्गत भागात तसेच डोंगराळ भागातील कचरा उचलण्यासाठी मदत होणार आहे. अडचणीच्या ठिकाणी ही गाडी सहज नेता येणार आहे. आकाराने लहान असल्यामुळे तिचा कुठेही कचरा आणण्यासाठी वापर होऊ शकतो. या फायदा पालिकेसह नागरिकांना होणार आहे, असेही त्या म्हणाल्या.