
नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर अर्धा शेतात, अर्धा रस्त्यावर
85213
ओसरगाव : मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त कंटेनर.
नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर
अर्धा शेतात, अर्धा रस्त्यावर
ओसरगावात अपघात; चालक पसार
कणकवली, ता.२५ : मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे शुक्रवारी (ता.२४) रात्री सव्वादहाच्या सुमारास मालवाहू कंटेनरचा अपघात झाला. कंटेनर(एम.एच.०४ एच.वाय.९३०६) हा गोवा ते मुंबईच्या दिशेने चालला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन बॅरिकेड्स तोडून शेतात घुसला. कंटेनर अर्धा शेतात अन् अर्धा रस्त्यावर राहिल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले; मात्र अपघातानंतर कंटेनरचालकाने तेथून पलायन केले. हा अपघात ओसरगाव गोदामापुढे ५० मीटर या ठिकाणी घडला. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाठक, हवालदार श्री. वेंगुर्लेकर, श्री. देसाई, श्री. सरमळकर, श्री. डिसोझा, श्री. भुतेलो, तसेच कॉन्स्टेबल दत्ता कांबळे यांनी पंचनामा केला. तसेच महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.