‘तुतारी’च्या थांब्यासाठी नांदगावात आज बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘तुतारी’च्या थांब्यासाठी 
नांदगावात आज बैठक
‘तुतारी’च्या थांब्यासाठी नांदगावात आज बैठक

‘तुतारी’च्या थांब्यासाठी नांदगावात आज बैठक

sakal_logo
By

85214
नांदगाव रोड रेल्‍वे स्थानक.

‘तुतारी’च्या थांब्यासाठी
नांदगावात आज बैठक

वेळप्रसंगी ‘रेल रोको’ आंदोलन

कणकवली, ता.२५ : नांदगाव पंचक्रोशीतील सर्वांना जवळ असलेले नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येथे ‘तुतारी’ रेल्वेला थांबा मिळण्यासाठी वेळप्रसंगी ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या नियोजनासाठी उद्या (ता.२६) सकाळी दहाला नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येथे बैठकीचे आयोजन केले आहे. वाघेरीचे माजी सरपंच संतोष राणे यांनी ही माहिती दिली.
राणे म्हणाले की, नांदगांव रेल्वे स्टेशन या ठिकाणी कोरोना काळापासून ‘तुतारी’ रेल्वेला थांबा बंद केला आहे. वारंवार संबंधित विभागांना व मंत्र्यांना विनंती करूनही अद्याप रेल्वे थांब्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे येत्या काळात ‘रेल रोको’ आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. आंदोलनाच्या नियोजनासाठी उद्या (ता.२६) सकाळी दहाला नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येथे बैठकीचे आयोजन केले आहे. पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. यावेळी ‘रेल रोको’ची तारीख व वेळ निश्चित करून रेल्वे प्रशासनास माहिती देण्यात येणार आहे. ‘तुतारी’ला थांबा मिळण्यासाठी एकजुटीने आंदोलन करण्याचे नियोजन करू.