भारताच्या संस्कृतीत जैन धर्माचे मोठे योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारताच्या संस्कृतीत जैन धर्माचे मोठे योगदान
भारताच्या संस्कृतीत जैन धर्माचे मोठे योगदान

भारताच्या संस्कृतीत जैन धर्माचे मोठे योगदान

sakal_logo
By

85221
खारेपाटण : येथील जैन मंदिरामध्ये केंद्रीय गृहराज्‍यमंत्री अजय मिश्रा यांचा सत्‍कार दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटणतर्फे करण्यात आला. (छायाचित्र : रमेश जामसंडेकर)

भारताच्या संस्कृतीत जैन धर्माचे मोठे योगदान

केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा; खारेपाटण येथील मंदिराला भेट

खारेपाटण, ता.२५ : आपल्या भारत देशाच्या प्रगतीमध्ये विविध जाती धर्माचे, संप्रदायातील लोकांचे मोठे योगदान आहे. तसेच देशाच्या उत्थानात व संस्कारात जैन धर्माचेही मोठे योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन केंद्रिय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी केले. खारेपाटण येथील जैन बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्तरावरून ‘लोकसभा प्रवास व जनतेशी संवाद’, या उपक्रमाअंतर्गत खारेपाटण येथील प्रसिद्ध दिगंबर पार्श्वनाथ जैन मंदिरला केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्रा यांनी भेट दिली. यावेळी दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटण यांच्यातर्फे त्‍यांचा सत्‍कार झाला. यावेळी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, माजी रवींद्र उर्फ ​​बाळा जठार, तृप्ती माळवदे, खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, संदीप लेले, अमित आवटी, खारेपाटण जैन समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास डोर्ले, सूर्यकांत भालेकर, राजेंद्र ब्रम्हदंडे, सुधीर कुबल, ग्रामपंचायत सदस्य मनाली होनाळे, क्षितिजा धुमाळे, अमिषा गुरुव, धनश्री ढेकणे, किरण कार्ले आदी उपस्थित होते. यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर व खारेपाटण रेल्वे स्टेशन कृती समीतीचे सचिव सूर्यकांत भालेकर यांनी खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म बांधून देण्याबाबतचे निवेदन मंत्र्यांना दिले. बाळू पंडित यांनी आभार मानले.
-------
झारखंड मंदिराबाबत वेधले लक्ष
प्रारंभी केंद्रीय मंत्री मिश्रा यांनी येथील जैन मंदिरात दर्शन घेतले. यावेळी झारखंड येथील जैन धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ पर्यटन केंद्र म्हणून घोषित केले आहे. याला जैन धर्मीय बांधवांचा विरोध असून सदर प्रस्ताव रद्द करावा. त्याचे पावित्र्य राखावे, या आशयाचे निवेदन जैन बांधवांनी दिले. दरम्यान, याबाबत केंद्र सरकार निश्चित प्रयत्न करणार असून ते रद्द करून त्याचे पावित्र्य राखले जाईल, अशी ग्‍वाही मंत्री मिश्रा यांनी दिली.