लांजा विविध कार्यकारी संस्थेचा अमृत महोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा विविध कार्यकारी संस्थेचा अमृत महोत्सव उत्साहात
लांजा विविध कार्यकारी संस्थेचा अमृत महोत्सव उत्साहात

लांजा विविध कार्यकारी संस्थेचा अमृत महोत्सव उत्साहात

sakal_logo
By

rat२५१८.txt

बातमी क्र..१८ (पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat२५p१८.jpg ः
८५२२९
लांजा ः तहसीलदार प्रमोद कदम यांचा सत्कार करताना चेअरमन प्रकाश लांजेकर. शेजारी मनोहर बाईत, राहुल शितोळे.
---

लांजा विविध कार्यकारी संस्थेचा अमृत महोत्सव

लांजा, ता. २५ ः कोकण विभागातील सहकारनिष्ठ पुरस्कारप्राप्त पहिली विविध कार्यकारी सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या लांजा पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात झाला.
या वेळी तहसीलदार प्रमोद कदम, नगराध्यक्ष मनोहर बाईत, पुरवठा कार्यालय शाखेचे राहुल शितोळे, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, लांजा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्ररवेश घारे, सोसायटी अध्यक्ष प्रकाश लांजेकर, उपाध्यक्ष विकास चव्हाण तसेच वैभव शिंदे, संस्था संचालक सुनील कुरूप, रिजवान मुजावर, दिलीप आगरे, अश्विनी जाधव, संतोष बेनकर, कृष्णा गोसावी, सुनील गुरव आदी उपस्थित होते. संस्थेच्या आजवरच्या कार्याचा गौरव करताना संस्थेने ७५ वर्षात केलेल्या सभासदाभिमुख कारभाराचा आढावा घेतला. ७५ वर्षात एकदाही निवडणूक न होता संस्थेची निवडणूक कायमच बिनविरोध झाल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमानंतर संस्थेच्या सर्व सभासदांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
---