हुर्रा रे हुर्रा आणि आमच्या देवाचा सोन्याचा तुरा रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुर्रा रे हुर्रा आणि आमच्या देवाचा सोन्याचा तुरा रे
हुर्रा रे हुर्रा आणि आमच्या देवाचा सोन्याचा तुरा रे

हुर्रा रे हुर्रा आणि आमच्या देवाचा सोन्याचा तुरा रे

sakal_logo
By

rat२५७.txt

बातमी क्र..७ (पान ५ साठी, सेकंड मेन)

फोटो ओळी
-rat२५p१९.jpg-
८५२३०
रत्नागिरी ः जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरवात झाली असून होळी उभी करून होम करण्यात आला
-

हुर्रा रे हुर्रा आणि आमच्या देवाचा सोन्याचा तुरा रे...

शिमगोत्सवाची धूम ; एक हजार ३०० सार्वजनिक होळ्या

रत्नागिरी, ता. २५ ः ''हुर्रा रे हुर्रा आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा रे... होलिओ'', अशा फाका देत शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात १ हजार ३१५ सार्वजनिक तर २ हजार ८५४ खासगी होळ्या उभ्या झाल्या. ग्रामदेवतांच्या पालख्यांना रूपं लागणार असल्याने चाकरमानीदेखील शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. सुमारे १ हजार ३४७ पालख्या जिल्हाभरात घरोघरी फिरणार असून, काही पालख्या सहाणेवर विराजमान होणार आहेत. जोरदार फाकांनी जिल्ह्यांत होळ्या प्रज्वलित झाल्या.
फाक पंचमीला गावागावात होळ्या उभ्या करून शिमगोत्सवाची सुरवात झाली. आठ दिवस हा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. ढोलताशांच्या गजरात आणि फाकांच्या आवाजात सर्वत्र होळी आणण्यात आली. शिमगोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल होऊ लागले आहेत. प्रत्येक गावातून देवाला कौल लावून नंतर ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागल्या आहेत. शिमगोत्सवाची धूम सुरू झाली असून कोरोना नियमातून मुक्त मिळाल्याने यावर्षीचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे.
--

जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय
सार्वजनिक, खासगी होळ्या आणि पालख्यांची संख्या

पोलिस ठाणे*सार्वजनिक होळ्या*खासगी होळ्या*पालख्या

रत्नागिरी शहर*१६*१०५*१५
रत्नागिरी ग्रामीण*७८*१३३*६८
जयगड*४५*१६६*२०
पूर्णगड*३०*६५*५५
राजापू*१०४*१४२*६१
नाटे*१*४०*१०
लांजा*९६*११४*९८
देवरूख*१२०*११२*१२०
संगमेश्‍वर*८७*१८०*८७
चिपळूण*९७*१७७*८७
गुहागर*६*२३०*४६
सावर्डे*४४*२५०*४०
अलोरे*३१*८५*३१
खेड*२२०*३६०*५७१
दापोली*१५०*४५०*००
मंडणगड*७५*१५०*४०
बाणकोट*३०*००*३२
दाभोळ*२५*८५*२५