''आनंदाचा शिधा’ करणार यंदाचा गुढीपाडवा गोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''आनंदाचा शिधा’ करणार यंदाचा गुढीपाडवा गोड
''आनंदाचा शिधा’ करणार यंदाचा गुढीपाडवा गोड

''आनंदाचा शिधा’ करणार यंदाचा गुढीपाडवा गोड

sakal_logo
By

''आनंदाचा शिधा’ करणार यंदाचा गुढीपाडवा गोड

११ लाख २६ हजार लाभार्थी ; १०० रुपयात शिधा

रत्नागिरी, ता. २६ ः दिवाळीप्रमाणेच येत्या गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ''आनंदाचा शिधा'' देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा हा शिधा असणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश असलेल्या जिल्ह्यातील ११ लाख २६ हजार ७८० लाभार्थ्यांना या आनंदाच्या शिधाचा लाभ मिळणार आहे.
शासनाने यापूर्वी देखील दिवाळीत आनंदाचा शिधा म्हणून रवा, चणाडाळ, साखर आणि तेल या चार वस्तूंना एकत्रित देण्याचे जाहीर केले. अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या प्राधान्य आणि अंत्योदय कुटुंबाला हा शिधा देण्यात आला होता; मात्र, उशिरा निविदा काढल्याने हा शिधा काहींना उशिरा मिळाला. त्यामुळे या लाभार्थींना ऐन दिवाळीत हा आनंदाचा शिधा मिळाला नाही. त्यामुळे मोजक्याच लोकांची दिवाळी गोड झाली. शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सर्वसामान्यांचा गुढीपाडवा गोड व्हावा यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला हा शिधा देण्यात येणार आहे.
अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार २२ मार्चला गुढीपाडवा आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिधा दिला जाणार आहे. जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य गटातील ९ लाख १० हजार ६७२ लाभार्थी आणि अंत्योदय गटातील १ लाख ३६ हजार १०७ लाभार्थी अशा ११ लाख २६ हजार ७८० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे नागरिकांचे सण, उत्सव आनंदात साजरा होणार आहे. आता येत्या मराठी वर्षाच्या प्रारंभी, गुढीपाडव्याला आणि आंबेडकर जयंतीला हा शिधा दिला जाणार आहे. त्यासाठी बैठका घेऊन निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे हा शिधा वेळेवर मिळण्याची शक्यता आहे.
-
कोट
शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या प्राधान्य गटातील आणि अंत्योदय गटातील शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिवाळीप्रमाणेच १०० रुपयांत साखर, रवा आणि चणाडाळ प्रत्येकी एक किलो तसेच एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे.
- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी