प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य
प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य

प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य

sakal_logo
By

रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य
प्रशांत परांजपे ; जलजीवनसाठी जलस्रोत शुद्ध हवेत
दाभोळ, ता. २५ः जलशक्ती अभियानांतर्गत संपूर्ण भारत हा जलयुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष योजना सुरू केली आहे. भविष्यात पाणी हा मुख्य भेडसावणारा प्रश्न राहणार असून आजपासून प्रत्येकाने थेंबाचे महत्व जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत जलप्रेमी प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केले. आजपासूनच प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर आणि पाण्याचा पुनर्वापर करण्यावर जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये छपरावर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याकरिता रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रत्येकाने अनिवार्य करणे आवश्यक आहे.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत हर घर जल किंवा नळ हे शासनाचे धोरण असून त्या पद्धतीने कामकाजाला सुरवात झाली आहे; मात्र याकरिता असलेले जलस्रोत शुद्ध ठेवणे आणि त्याची पातळी वाढवणे आवश्यक असल्याचे मत परांजपे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे जिथे तलाव असतील, खासगी विहिरी, सार्वजनिक विहिरी बंद असतील त्या रिचार्ज करणे आणि त्यांच्या माध्यमातून पाणी वापर संस्था स्थापन करून स्वतंत्र छोट्या-छोट्या पाणीयोजना तयार करणे ही काळाची गरज आहे. तसेच सागराच्या पाण्यापासून हरितक्रांती हा प्रकल्प प्रत्यक्षात आणला गेल्यास अथांग असलेल्या सागराचे पाणी वापरून हरितक्रांती घडवण्यात येते. याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. शासनाने आणि जनसामान्याने सर्वांनीच जलशक्तीच्या माध्यमातून स्वतःचं आयुष्य हे शक्तिमान आणि जलयुक्त करण्याकरिता थेंबाथेंबाचे महत्व जाणून घ्या आणि निवेदिता प्रतिष्ठानच्या जलयुक्त आवार या संकल्पनेत सहभागी व्हा, असे आवाहन केले. जलरक्षक या पदाची नियुक्ती करण्याचे काम सुरू असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले असून, निवेदिता प्रतिष्ठान जालगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या संस्थेकडे अधिक माहितीकरिता आणि सहभागाकरिता संपर्क करा, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले आहे.