
दळवटणेत शिवरायांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक
दळवटणेत शिवजयंचीनिमित्त मिरवणूक
चिपळूण, ता. २५ः छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी, स्वराज्याच्या मावळ्यांना अंगाखांद्यावर घेऊन खेळलेल्या दळवटणे भुवडवाडी येथील रेवेचा माळ येथे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून व ग्रामस्थांसमवेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीमधून सनई चौघड्यांच्या जयघोषात त्याचबरोबर शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. या निमित्ताने दळवटणे येथील सर्व प्राथमिक शाळा व विद्यालयांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. शिवजयंती कार्यक्रमाला संपूर्ण गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष त्याचबरोबर आमदार शेखर निकम उपस्थित होते. दळवटणे गावातील लष्करी छावणीमध्ये हंसाजी मोहिते यांना सरनोबती बहाल करून हंबीरराव हा किताब देण्यात आला. अशा या दळवटणे गावाचा इतिहास पुन्हा सर्वांना ज्ञात व्हावा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान चिपळूण विभागाने रस्त्याच्या कडेला अथवा चौकात शिवजयंती साजरी न करता दळवटणे रेवेचा माळ, भुवडवाडी येथे शिवजयंती साजरी केली.