
कोतवली-बौद्धवाडीत प्रौढाची आत्महत्या
rat२५३०.txt
(पान ३ साठी, संक्षिप्त पट्टा)
कोतवली-बौद्धवाडीत प्रौढाची आत्महत्या
खेड ः तालुक्यातील कोतवली वरची बौद्धवाडी येथे एका ७० वर्षीय प्रौढाने घरानजीकच्या गुरांचा गोठा येथे असलेल्या आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (ता. २४) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघड झाला. बबन विठाजी तांबे असे त्या आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ते गुरुवारी (ता. २३) रोजी जेवण करून झोपले होते; मात्र त्यानंतर त्यांनी घरातून बाहेर पडून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
-----------
लोटेत कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांची तपासणी
खेड ः अडरे सुर्वे ग्रुप व लाईफ केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पिरलोटे (ता. खेड) येथील रोटरी क्लब भवन येथे सुर्वे ग्रुपचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना दोन दशकाहूनही अधिक काळ सुर्वे ग्रुप ही संस्था मनुष्यबळ पुरवत आहे. या ग्रुपने आपले कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी शिबिर आयोजित केले होते. या वेळी सुर्वे ग्रुपचे संचालक संदीप सुर्वे, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुभाष राहाटे, सचिव पद्माकर सुतार, भारतीय सैन्यदलाचे निवृत्त अधिकारी रामचंद्र सुर्वे, सर्व्हिसेसच्या संचालिका श्रावणी सुर्वे, लाईफ केअर हॉस्पिटलचे प्रमुख तज्ज्ञ डॉ. रोहित कळंबकर, डॉ. अमीन चौगुले, डॉ. प्राची हरवंदे उपस्थित होते.