रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

Published on

-- ---------

अभाविपतर्फे रत्नागिरीत २८ ला युवा शिबिर
रत्नागिरी ः जिल्ह्यात प्रथमच २८ फेब्रुवारीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हास्तरीय युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाला उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये विविध विषयांवर नामांकित वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यात ग्रामीण अर्थव्यवस्था व रोजगाराच्या संधी या विषयावर अमुल डेअरीचे रूपेश चंदनशिव मार्गदर्शन करतील. कोकणातील व्यावसायिकता या विषयावर चितळे ग्रुपचे विश्वास चितळे, स्टार्टअप् विषयावर बुक गंगा डॉट कॉमचे सीईओ मंदार जोगळेकर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार या लोकशाहीत युवकांचे योगदान यावर भाषण करणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर एक चर्चासत्रही होणार असून यात प्रा. भूषण भावे बोलतील. या कार्यक्रमात रत्नागिरी, लांजा, राजापूर व संगमेश्वर या चार तालुक्यातून साधारण एक हजार पाचशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
--------

गोगटे महाविद्यालयात २८ ला विज्ञान प्रदर्शन
रत्नागिरी ः राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त गोगटे- जोगळेकर महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेच्या विविध विभागात २८ फेब्रुवारीला विज्ञान विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांना भेट देण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
हा दिवस महाविद्यालयातील विज्ञान शाखा ओपन डे म्हणून साजरा करते. या दिवशी रत्नागिरीकर विद्यार्थी नागरिक व इतर सर्व विज्ञानप्रेमी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळांना भेटी देऊ शकतात. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, संगणक, नवीन इमारतीमध्ये जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीव शास्त्र, गणित विभाग आणि आयटी विभागाच्या प्रयोगशाळांत निवडक प्रयोग, प्रगत उपकरणांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. महाविद्यालयातील अभ्यासेतर उपक्रम सायन्स असोसिएशन, नेचर क्लब, मराठी विज्ञान परिषद, खगोल अभ्यास केंद्र यांचाही सहभाग या उपक्रमांत सहभाग आहे. जास्तीत जास्त विज्ञानप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले आहे.
-------------

खेडमध्ये १ मार्चला महास्वच्छता मोहीम
खेड ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने १ मार्चला खेड शहरामध्ये महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये खेड शहरातील नागरिकांनी तसेच सेवाभावी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे समाजाभिमुख उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानच्या सौजन्याने १ मार्चला सकाळी ७.३० वा. खेड तालुक्यातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणारे आहे. स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांनी निवडून दिलेले स्वछतादूत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये खेड शहारामधील जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच सेवाभावी संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------

शिव सरपंचपदी महाडिक बिनविरोध
खेड ः तालुक्यातील शिव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रश्मी महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच शाहिस्ता परकार यांनी वैयक्तीक अडचणींमुळे राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. नायब तहसीलदार सिनकर यांच्या सरपंचपदासाठी अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सर्व सदस्यांनी सरपंचपदी महाडिक यांची सर्वानुमते निवड केली. उपसरपंच दुर्वेश पालेकर यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संदेश डफळे, वर्षा इप्ते, दिव्या पांचाळ, लक्ष्मी गावडे, सारिका जाधव, श्रुती तांबे, ग्रामसेवक चंद्रकांत वारघडे आदी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजना राबवून गावच्या विकासाला प्राधान्य देऊन ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवू, असे महाडिक यांनी सांगितले.
-------------

खेड पालिकेकडून महिला बचतगटांना मार्गदर्शन
खेड ः येथील नगर पालिकेकडून माझी वसुंधरा अभियान ३.० व स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला आहे. या मोहिमेंतर्गत चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्र व लोटेतील डाऊ केमिकल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ''प्लास्टिक कचरा टाकू नका'' उपक्रम राबवण्यात येत आहे. मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महिला बचतगटांची सभा घेण्यात आली. स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर, शहर समन्वयक मुक्ताई तिर्थकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नेहा करमरकर यांनी महिला बचतगटांना मार्गदर्शन करत उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com