
रत्नागिरी- इन्फिगो आय केअरमध्ये आजपासून
इन्फिगो आयमध्ये आजपासून
रेटिनाविषयक तपासणी शिबिर
रत्नागिरी, ता. २५ : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये २६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रख्यात रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत मधुमेही रुग्णांच्या डोळ्यांच्या पडद्याची तपासणी करणार आहेत. तसेच सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत.
शंकर नेत्रालय (चेन्नई) येथून विशेष उच्च प्रशिक्षित रेटीनातज्ज्ञ डॉ. कामत हे इन्फिगो आयकेयर हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला येऊन तपासणी करतात. कोकणात रेटिनातज्ज्ञ उपलब्ध नसल्याने त्यांनी दीड वर्षांत हजारो रुग्णांवर येथेच उपचार केले आहेत. मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्याच्या पडद्याच्या आजारावर निदान, उपचार व शस्त्रक्रिया ते करतात. शिबिराच्या कालावधीत डॉ. कामत रेटिनाच्या अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रकिया साळवी स्टॉप येथील इन्फिगो आय केअरमध्ये करणार आहेत. इन्फिगोचा रेटीना विभाग बी स्कॅन, ग्रीन लेझर, थ्री डी ओसीटी व अत्याधुनिक अर्टली विटरेक्टॉमी मशीन अशा यंत्रणांनी सुसज्ज आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगो हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.