
निवृत्त शिक्षकांचा मंगळवारी स्नेहमेळावा
निवृत्त शिक्षकांचा मंगळवारी स्नेहमेळावा
कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा कणकवलीचा वार्षिक स्नेहमेळावा मंगळवारी (ता. २८) सकाळी १०.३० वाजता वृंदावन हॉल कलमठ येथे चंद्रकांत तेली यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी जिल्हा मंडळाचे अध्यक्ष सावळाराम अणावकर, उपाध्यक्ष प्रकाश दळवी, ना. य. सावंत, सुधाकर खानविलकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. या स्नेहमेळाव्याला सेवानिवृत्त शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका सचिव अनिलकुमार माळवदे यांनी केले आहे.
--
बावळाट येथे विविध कार्यक्रम
ओटवणे ः बावळाट ग्रामदैवत श्री देवी सातेरी माऊली पंचायतन देवस्थानचा ३० वा वाढदिवस मंगळवारी (ता. २८) होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम, दुपारी आरती, त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ वाजता धार्मिक विधी, आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री १२.३० वाजता म्हापण येथील अमृतनाथ दशावतार मंडळाचा ''पंढरीचा पहिला वारकरी'' हा नाट्यप्रयोग होणार आहे.