Sat, March 25, 2023

रत्नागिरी-आज जॉब फेअर
रत्नागिरी-आज जॉब फेअर
Published on : 25 February 2023, 2:40 am
गोगटे जोगळेकरमध्ये
आज जॉब फेअर
रत्नागिरी, ता. २५ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल, ध्येय अॅकॅडमी ऑफ स्कील डेव्हलपमेंट आणि आरपीज् अॅकॅडमी यांच्या वतीने रविवारी (ता. २६) जॉब फेअरचे आयोजन केले आहे. यामध्ये मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथील विविध क्षेत्रातील १४ कंपन्यांचा समावेश आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये हॉलमध्ये उपस्थित राहावे; असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा.