
राजापूर-स्पर्धा परीक्षांसाठी नियोजन आणि जिद्द हवी
फोटो ओळी
-rat26p11.jpg-KOP23L85378 राजापूर : प्रांतधिकारी वैशाली माने यांचा सत्कार करताना मान्यवर.
स्पर्धा परीक्षांसाठी नियोजन आणि जिद्द हवी
-
वैशाली माने ; मराठे महाविद्यालयाच्या शिबिराची सांगता
राजापूर, ता. २६ ः सरकारी नोकरीत जाण्यासाठी विविध आयोगामार्फत विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या स्पर्धा परीक्षांना लाखो विद्यार्थी बसतात. पण अभ्यासू विध्यार्थीच उत्तीर्ण होतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपला आत्मविश्वास दृढ असावा लागतो. अंगी जिद्द, चिकाटी व अभ्यासाचे नियोजन असेल तरच निश्चितच यश मिळते, असे प्रतिपादन प्रांताधिकारी वैशाली माने यांनी केले.
तालुक्यातील विखारे गोठणे येथील आबासाहेब मराठे कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा सांगता समारंभ दोनिवडे येथे झाली. या वेळी प्राचार्य डॉ. जी. डी. हराळे, दोनिवडेच्या सरपंच दीक्षा तोरस्कर, उपसरपंच जितेंद्र शिरवडकर, पोलिस पाटील सुचिता करंगुटकर, तंटामुक्ती अध्यक्ष जितेंद्र पवार, ग्रामसेवक निशांत रायकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप तोरस्कर, मुख्याध्यापक श्रेया करंबेळकर आदी उपस्थित होते. निवासी श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी गावामधील मंदिर स्वच्छता, रस्ते बांधणी व स्वच्छता, ओढ्यावरील बंधारे, आपती व्यवस्थापन, ग्राम सर्वेक्षण, नालासफाई आदी श्रमदान करून विकास कामाला हातभार लावला. तसेच आरोग्य विभागाच्या मदतीने गावातील स्त्री पुरुषांची तपासणी करण्यात आली. डॉ. उत्तम प्रभुदेसाई यांनी लहान मुलांच्या आरोग्य विषयक समस्या व उपाय, अॅड. प्रज्ञा सिनकर यांनी महिला अत्याचार व कायदे, योग प्रशिक्षक उल्हास गणपत खडसे यांचे योगासनाचे महत्व व प्रात्यक्षिक, अॅड. अभिजित अभ्यंकर यांनी मी आणि कोर्टातील किस्से, जान्हवी पाटील यांनी पत्रकारिता: लोकशाहीचा चौथा स्तंभ, डॉ. सुहास कांबळे व डॉ. राजेंद्र बावळे यांचे काव्य वाचन व विनोदी किस्से, राम मेस्त्री यांचे वातावरणातील बदल व जेष्ठ नागरिकांचे आरोग्य अशा विविध वक्त्यांनी व्याख्याने दिली. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बाबू सोलार यांनी केले.