चिपळूण-डीबीजेत कार्यालयीन मराठी भाषालेखन कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-डीबीजेत कार्यालयीन मराठी भाषालेखन कार्यशाळा
चिपळूण-डीबीजेत कार्यालयीन मराठी भाषालेखन कार्यशाळा

चिपळूण-डीबीजेत कार्यालयीन मराठी भाषालेखन कार्यशाळा

sakal_logo
By

डीबीजेत कार्यालयीन मराठी भाषालेखन कार्यशाळा
चिपळूण, ता.२६ः येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात प्रा. डॉ. विष्णू दादा वासमकर यांची कार्यालयीन मराठी भाषालेखन कार्यशाळा झाली. मराठी विभागातर्फे राजभाषा दिनानिमित्त उत्सव माय मराठीचा या उपक्रमांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी प्राचार्य डॉ. एम. एस. बापट, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी उपस्थित होते.
भाषा वापरणे हे एक तंत्र आहे. भाषा लवचिक असते. त्याच्या वापर अचूक होणे अत्यंत आवश्यक असते. लिहिलेल्या मजकूराचा अपेक्षित व योग अर्थ निघणे महत्त्वाचे असते. यासाठी कार्यालयीन भाषा महत्वाची आहे. यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे मत मराठी विभाग प्रमुख प्रा. राजरत्न दवणे यांनी व्यक्त केले.
प्रा. डॉ. विष्णू दादा वासमकर यांनी शुद्धलेखन कसे करावे? शब्दांचा वापर कसा करावा? प्रमाण भाषा व बोलीभाषा यांचे महत्त्व, अनुस्वाराचे नियम आदीबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला तालुक्यातील महाविद्यालयीन शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मराठी विभागाने विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. तृप्ती यादव यांनी केले.