पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

टीडीएफ, कास्ट्राईबची
आज जाकादेवीत सभा
पावस ः रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीडीएफ व कास्ट्राईब शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची महत्वपूर्ण सभा सोमवारी (ता. २७) सायंकाळी ६.३० वाजता जाकादेवी येथील दत्तात्रय गायकवाड यांच्या सभागृहात होणार आहे. शिक्षक संघटनांचे नेते सागर पाटील, प्रदीप वाघोदे मार्गदर्शन करणार आहेत. जाकादेवी परिसरातील टीडीएफ व कास्ट्राईब संघटना कार्यकर्ते व सभासद यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटना नेते सागर पाटील, प्रदीप वाघोदे यांनी केले आहे.


युवासेना चिपळूण उपतालुकाप्रमुखपदी सुयोग कदम
चिपळूण ः युवासेनेच्या चिपळूण उपतालुकाप्रमुखपदी सुयोग सुभाष कदम यांची निवड झाल्याची घोषणा युवासेना कोअर कमिटी सदस्य विक्रांत जाधव यांनी केली. श्री. जाधव यांनी सुयोगचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सावर्डे येथे शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेच्या सावर्डे विभागाची बैठक झाली. युवासेनेचे तालुकाप्रमुख उमेश खाताते, शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, युवा सेना उपतालुकाप्रमुख अंकुश जाधव, ठाकरे गटाचे तालुका सचिव सागर सावंत, विभाग प्रमुख संदीप राणे, युवती सेना शहर प्रमुख डॉ. सानिका टाकळे, युवती सेनेच्या तालुकाधिकारी शिवानी कासार आदी उपस्थित होते.
---------

दापोलीत बुधवारी महास्वच्छता अभियान
दाभोळ ः महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे
१ मार्चला दापोली शहरामध्ये महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानात दापोलीतील सर्व श्री सदस्य सहभाग घेऊन अभियान यशस्वी करणार आहेत. सकाळी ७.३० वाजता दापोली शहरातील विविध ठिकाणी विशेषत: तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय, बुरोंडी नाका ते काळकाई कोंड पाण्याची टाकी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. अभियानात ७०० पेक्षा जास्त श्री सदस्य सहभागी होणार आहेत. नागरिकांनी व सेवाभावी संस्थानी या महास्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.