महिला उद्योजकतेला चालना 
देण्यासाठी डिजिटल व्हॅन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी डिजिटल व्हॅन

महिला उद्योजकतेला चालना
देण्यासाठी डिजिटल व्हॅन
मुंबई, ता. २६ : महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्याचे कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘सशक्ती डिजिटल व्हॅन’चा शुभारंभ करण्यात आला.
मास्टरकार्ड अँड लर्निंग लींक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या ३१ मार्चपर्यंत सुमारे ७ हजार ५०० महिलांपर्यंत पोहोचून त्यांना उद्योजकतेसंदर्भात माहिती देण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मंत्री लोढा यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी मास्टर कार्डचे संचालक रोहन सिरकर, लर्निंग लिंक्स फाउंडेशनचे व्यवस्थापकीय सल्लागार मोहम्मद अमीर एजाज, जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर, बँकेचे व्यवस्थापक मिलिंद देसाई, सीएससी महाराष्ट्रचे सहाय्यक महाव्यवस्थापक धवल जाधव, माजी नगरसेवक अभिजीत सावंत, सामाजिक कार्यकर्ते विनोद दुबे, सशक्ती टीमचे चंद्रकांत अहिरे, सनम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
---
खारोडीतील चेंबरच्‍या झाकणाला तडा
मालाड, ता. २५ ः खारोडी येथील सेंट ज्यूडस शाळेच्या प्रवेशद्वारालगत असलेले गटार पुन्हा तुटून चेंबरच्‍या झाकणालाही तडा गेल्याने अपघाताची भीती वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेच्यावतीने या गटाराची दुरुस्ती केली होती. तसेच झाकणही या ठिकाणी बसवण्यात आले होते. मात्र दुरुस्ती केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच गटारावरील सिमेंट उखडण्यास सुरू झाले होते. पालिकेच्या ‍या कामगिरीवर आता प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. या ठिकाणी सेंट ज्यूडस शाळा, रहिवासी संकुल, बँक आहे त्‍यामुळे या भागात मोठी वर्दळ असते. अशा वेळी गटारावरील चेंबरच्‍या तडा गेलेल्‍या झाकणामुळे दुर्घटनेची भीती वर्तवली जात आहे. तसेच पालिकेने ठोस कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com