अल्पसंख्याकांसाठी दोडामार्गला प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पसंख्याकांसाठी दोडामार्गला प्रशिक्षण
अल्पसंख्याकांसाठी दोडामार्गला प्रशिक्षण

अल्पसंख्याकांसाठी दोडामार्गला प्रशिक्षण

sakal_logo
By

अल्पसंख्याकांसाठी दोडामार्गला प्रशिक्षण
दोडामार्ग ः येथील आयटीआय केंद्रात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार अल्पसंख्याक युवक-युवतींसाठी टेक्निशियन इन्स्ट्रुमेंटेशन या अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. हा अभ्यासक्रम ४२० तासांचा असून प्रशिक्षण निःशुल्क आहे. यासाठी प्रवेश पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. १ एप्रिलपासून अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरू होत असून प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. अधिक माहितीसाठी प्रशिक्षण समन्वयक आर. डी. जानवेकर, एस. के. चारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी डी. पी. सोनवणे यांनी केले आहे.
--
वागदेत रक्तदान शिबिराचे आयोजन
कणकवली ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधू रक्तमित्र कणकवली शाखेच्यावतीने ९ मार्चला सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वागदे येथील गोपुरी रक्तदान आश्रमात महिलांसाठी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात ज्या महिला रक्तदान करणार आहेत, त्यांनी तन्वी भट-कुलकर्णी, वरवडेकर, श्रद्धा पाटकर, सिद्धी लोके यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
-------------
परुळेत महिलादिनी ‘खेळ पैठणीचा’
वेंगुर्ले ः परुळे युवक कला-क्रीडा मंडळाच्या महिला विभागामार्फत महिला दिनानिमित्त ८ मार्चला परुळेतील महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी तीनला येथील वराठी मंगल कार्यालय येथे होणार आहे. यात परुळेतील ३२ वाड्यांमधील १८ वर्षांवरील मुली व महिला तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त परुळेत वास्तव्य करणाऱ्या मुली व महिला सहभागी होऊ शकतात.
--
नांदगाव येथे रिक्षा संघटनेतर्फे कार्यक्रम
कणकवली ः नांदगाव येथील सन्मित्र रिक्षा संघटनेच्या वतीने २८ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी नऊ वाजता महापूजा, आरती, महाप्रसाद, दुपारी दोन वाजल्यानंतर स्थानिक भजने, महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. तसेच रात्री दशावतार नाट्य सादर केले जाणार आहे.
--
कलमठला आज आरोग्य तपासणी
कणकवली ः पिरामल स्वास्थ्य संस्था व कलमठ ग्रामपंचायत तर्फे आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सभागृहांमध्ये उद्या (ता.२७) सकाळी साडेदहा ते दुपारी दोन यावेळत मोफत आरोग्य तपासणी होणार असून यावेळी रक्तदाब, मधुमेह तपासणी शिबिरत होणार आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. यात सहभाग घेण्याच्या आवाहन सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले आहे.