रत्नागिरी- गुढीपाडवा स्वागतयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- गुढीपाडवा स्वागतयात्रा
रत्नागिरी- गुढीपाडवा स्वागतयात्रा

रत्नागिरी- गुढीपाडवा स्वागतयात्रा

sakal_logo
By

रत्नागिरीत निघणार गुढीपाडवा स्वागतयात्रा
नियोजनासाठी बैठक ; ७५ चित्ररथ होणार सहभागी
रत्नागिरी, ता. २६ : प्रतिवर्षाप्रमाणे अठराव्या वर्षी येथे हिंदू नववर्ष गुढीपाडवा स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. ग्रामदेवता श्री देव भैरी मंदिर ते समाजमंदिर श्री पतितपावन मंदिरापर्यंत निघणाऱ्या या यात्रेत ७५ पेक्षा जास्त चित्ररथ सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशभूषेत हजारो हिंदू बंधू-भगिनी या स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेच्या संदर्भातील नियोजन बैठक रविवारी (ता. २६) सायंकाळी पतितपावन मंदिरात झाली.
या बैठकीत श्री देव भैरी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांनी सर्वांना आवाहन केले की दरवर्षी आपण या स्वागतयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतो. श्री भैरी मंदिरात गुढी उभी केल्यानंतर ९ वाजता स्वागयात्रेला सुरवात होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने हिंदू बंधू-भगिनींनी यामध्ये सहभागी व्हावे. यात्रेच्या प्रचारासाठी वाहन फेरी काढण्यात येईल. तसेच नियोजनाची आणखी बैठकही आयोजित करण्यात येणार आहे.
झाडगाव येथील भैरी मंदिर येथून प्रारंभ झाल्यानंतर स्वागतयात्रा, कॉंग्रेसभवन, गोखले नाकामार्गे जयस्तंभ येथे येईल. येथे ही यात्रा आणि मारुती मंदिरपासून निघालेली स्वागतयात्रा एकत्र होऊन विराट संख्येने राम आळी मार्गे, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात पोहोचणार आहे. या मंदिरात हिंदु धर्माची शपथ घेऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे.
बैठकीला श्री देव भैरी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे, उपाध्यक्ष राजन जोशी यांच्यासमवेत आनंद मराठे, सुधाकर सावंत, मुकुंद जोशी, एस. बी. खेडेकर, उमेश खंडकर, राजेश आयरे, कौस्तुभ सावंत, राजू जोशी, रवींद्र भोवड, गणेश भिंगार्डे, राकेश नलावडे, संजय जोशी, शहरातील विविध देवस्थानांचे अध्यक्ष, पदाधिकारी, पाटीदार समाज, जैन समाजासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


चौकट १
१२१ मंडळांचे पदाधिकारी उपस्थित
आजच्या पहिल्या नियोजन बैठकीला १२१ मंडळ, संस्थांच्या प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मंडळांनी आपापला चित्ररथ किंवा जास्तीत जास्त पारंपरिक वेशभूषेत हिंदू बंधू-भगिनी सहभागी होतील, याची ग्वाही दिली. त्यामुळे यंदाची स्वागतयात्रा विराट होणार आहे. त्याकरिता विविध प्रकारचे नियोजन करण्यास आजपासून सुरवात झाली.