भंडारी हायस्कूलने विद्यार्थी घडविले
85486
मालवण ः भंडारी प्राथमिक शाळेत रंगमंचाचे उद्घाटन करताना ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर. सोबत विजय पाटकर, बी. जी. गोलतकर आदी.
भंडारी हायस्कूलने विद्यार्थी घडविले
अरविंद म्हापणकर ः मालवणात नूतन रंगमंचाचे उद्घाटन
मालवण, ता. २६ : ज्या शाळेत शिकलो, घडलो, त्या शाळेमध्ये रंगमंचाचे उद्घाटन माझ्या हस्ते होणे हे भाग्य समजतो. अभ्यासाबरोबरच मुलांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देणारी शाळा म्हणून भंडारी हायस्कूलकडे पाहिले जाते. या रंगमंचावर वावरणारी चिमुरडी मुले उद्याची भावी कलाकार म्हणून समाजासमोर येतील आणि मालवणच्या नावलौकिकात भर टाकतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगकर्मी अरविंद म्हापणकर यांनी येथे केले.
येथील भंडारी प्राथमिक शाळेच्या सभागृहात नव्याने तयार केलेल्या रंगमंचाचे उद्घाटन भंडारी हायस्कूलचे माजी विद्यार्थी साहित्यिक म्हापणकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, संस्थेचे उपाध्यक्ष बी. जी. गोलतकर, कॉन्सिल ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सुधीर हेरेकर, अभिमन्यू कवठणकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सदानंद मालवणकर, डॉ. सुभाष दिघे, लोकल कमिटीचे अध्यक्ष दशरथ कवटकर, जॉन नरोना, हायस्कूलचे मुख्याध्यापक वामन खोत, शशिकांत मयेकर, दिलीप मेस्त्री, प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा कांबळी, प्रा. पवन बांदेकर, प्रकाश कुशे, प्रफुल्ल देसाई, किशोर मळेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापिका कांबळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सहाय्यक शिक्षिका राधा दिघे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी म्हापणकर यांनी शालेय जीवनातील रंगमंचावरील आठवणींना उजाळा दिला. रंगमंचावर काम करता करता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना आपल्याच शाळेच्या रंगमंचाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. आयुष्यात नाटक उभे करण्यासाठी भरपूर कष्ट, श्रम घेतले. त्यामुळेच मला शाळेने या रंगमंचाच्या उद्घाटनाचा सन्मान दिला आणि माझ्या कष्टाचे चीज झाले, असे ते म्हणाले. संस्थाध्यक्ष पाटकर यांनी रंगमंचाच्या उभारणीसाठी शाम नाईक तसेच प्रकाश योजनेसाठी मुंबईच्या महेश नागवेकर यांनी देणगी दिल्याने या प्रशालेतील लहान मुले आपले कलागुण सादर करतील असे सांगितले. शिक्षक भूपेश गोसावी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधा दिघे, महेश लोकेगावकर, पूर्वी गोवेकर आदींनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.