मानव जातीच्या कल्याणार्थ कुडाळ शहरात शोभायात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानव जातीच्या कल्याणार्थ
कुडाळ शहरात शोभायात्रा
मानव जातीच्या कल्याणार्थ कुडाळ शहरात शोभायात्रा

मानव जातीच्या कल्याणार्थ कुडाळ शहरात शोभायात्रा

sakal_logo
By

85508
कुडाळ ः संत गरीबदास महाराज बोध दिवसानिमित्त मानव जातीच्या कल्याणासाठी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. (छायाचित्र ः अजय सावंत)

मानव जातीच्या कल्याणार्थ
कुडाळ शहरात शोभायात्रा

गरीबदास महाराज बोधदिनी उपक्रम

कुडाळ, ता. २६ ः शहरात संत गरीबदास महाराज बोध दिवसानिमित्त मानव जातीच्या कल्याणासाठी अध्यात्मिक ज्ञान तसेच व्यसनमुक्ती, हुंडामुक्त विवाह, भ्रष्टाचारमुक्त समाज, रक्तदान आदी उपक्रमांचा देशभर प्रचार व्हावा, यासाठी आज सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली.
देशभरात संस्थेच्या माध्यमातून निःशुल्क सत्संग, विविध भंडारे आयोजित होत असतात. प्रत्येक महिन्याला विशाल सत्संग होतो. संपूर्ण जिल्ह्याभरात जगतगुरू तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे हजारो अनुयायी असून ते संत रामपालजी महाराजांच्या आध्यात्मिक ज्ञानाने प्रेरित होऊन जीवन सुखाने जगत आहे. सत्संगाच्या माध्यमातून संत रामपालजी महाराज चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराण, पवित्र कुराण शरिफ, पवित्र बायबल, पवित्र गुरू ग्रंथ साहिब, सूक्ष्म वेद आदी पवित्र ग्रंथातील परमात्म्याचे गूढ रहस्य, दिव्य मंत्र यांची ओळख करून देतात. जगण्याच्या मार्गातून मुक्तीच्या मार्गाचा अनुभव दिला जातो. यासाठी अध्यात्मिक ज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती भाविक व ज्येष्ठ नागरिक दिलीप माने यांनी दिली. ही शोभायात्रा संजूचीवाडी एलआयसी कॉलनी-पोस्ट ऑफिस ते आंबेडकरनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी काढून सांगता करण्यात आली. या रॅलीत महिलांसह आबालवृध्दांनी सहभाग घेतला. दुचाकी, चारचाकी वाहनांचाही सहभाग होता.