
‘कोकण किंग कविलगाव’ संघ विजेता
85553
दुर्गवाड ः फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चा विजेता कोकण किंग अर्जुन-कविलगाव संघ.
‘कोकण किंग कविलगाव’ संघ विजेता
‘नेरूर फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी’; दुर्गवाडच्या क्रिकेट स्पर्धेला प्रतिसाद
कुडाळ, ता. २७ ः फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित ‘नेरूर फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३’ स्पर्धेचा ‘कोकण किंग अर्जुन-कविलगाव’ संघ मानकरी ठरला. तर उपविजेतेपद यश फायटर्स, कविलगाव संघाने पटकावले.
स्पर्धेत मालिकावीर अब्दुल्ला मुजावर, उत्कृष्ट फलंदाज जोएल नाईक, उत्कृष्ट गोलंदाज युसूफ शेख, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चतुर परब यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत फतेह मैदान, दुर्गवाड-नेरुर येथे पार पडली. यावेळी शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, उद्योजक देवेंद्र नाईक, फ्रेंड्स ग्रुपचे आजिम मुजावर, नियाज खान, फिरोज खतीब, नियाज शहा, नसरुद्दिन शहा, प्रशांत टेंबुलकर, बाळा पावसकर, बदर मुजावर, मुश्ताक नाईक, समीर मुजावर, बशीर मुजावर, करीम शहा, नफीस शेख, इमरान मुजावर, इर्शाद शेख, अनिस शहा, अम्मार मुजावर, रईस खान, फाइस खान, सरील खान, राहील खान, तबरेज खान, रितेश पेडणेकर, आबा पावसकर, जयगणेश पावसकर, अक्षय वरक, अमित झोरे, बाबल म्हाडदळकर, अब्दुल्ला मुजावर, शुभम नेरुरकर, प्रवीण नेरुरकर, आफान खान, युनूस खान, ओविश खान, सोहेल नाईक, आदिल नाईक, इरफान मुजावर आदी उपस्थित होते.