
समृद्धी पिळणकर यांना शैक्षणिक सेवारत्न पुरस्कार
85556
कुडाळ ः येथे समृद्धी पिळणकर यांचा गौरव करताना पद्मश्री परशुराम गंगावणे. शेजारी इतर.
समृद्धी पिळणकर यांना
शैक्षणिक सेवारत्न पुरस्कार
बांदा, ता. २७ ः वात्सल्य सामाजिक संस्था व निर्धार न्यूज लोकसेवा फाउंडेशन, महाराष्ट्र आयोजित मराठी राजभाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवराय संमेलन, कुडाळ २०२३ या कार्यक्रमात वेंगुर्ले एज्युकेशन सोसायटीच्या रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या उपक्रमशिल शिक्षिका समृद्धी पिळणकर-मुननकर यांना राष्ट्रीय लोकसेवा शैक्षणिक सेवारत्न सन्मान २०२३ हा पुरस्कार देण्यात आला. पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते तर ज्येष्ठ समाजसेविका कमल परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पंच महेश दाभोलकर, प्रा. रुपेश पाटील, वात्सल्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. नेहा परब आदी मान्यवर उपस्थित होते. मराठा समाज सभागृह कुडाळ येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वीही त्यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाण व भान ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी उल्लेखनीय कार्य तसेच विशेष कामगिरी करून राष्ट्रीय लौकिकात भर घालत असल्यामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात यांनी स्वागत केले. प्रा. वैभव खानोलकर यांनी सूत्रसंचालन केले.