
फुणगूसचा 5 मार्चपासून पीर उर्स
rat२७२१.TXT
बातमी क्र. २१ (टुडे ३ साठी)
फोटो ओळी
- rat२७p१३.jpg-
८५५६५
फुणगूस येथील हजरत शेख जाहीर शेख पिर यांचा दर्गा
---
फुणगूसचा ५ मार्चपासून पीर उर्स
दोन वर्षानंतर आयोजन ः ८ मार्चला सांगता
संगमेश्वर, ता. २७ ः संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील फूणगुस येथील हजरत शेख जाहीर शेख पिर बाबा या दर्गेचा वार्षिक उर्स महोत्सव ५ ते ८ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. या चार दिवसात विविध कार्यक्रम होणार असून नियाजने (कंदोरी) सांगता होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडी किनारी निसर्गाच्या सानिध्यात सर्वांग सुंदर व देखणा असा हजरत शेख जाहीर शेख पीर हा दर्गा उभा आहे. उत्सव काळात हजारो भाविक येथे येतात. त्यामुळे तीन दिवस परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. कोरोनामुळे गेले दोन वर्षे येथील उर्स अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. यावेळी धुमधडाक्यात व जल्लोषपूर्ण वातावरणात येथील उर्स उत्सव साजरा करण्याचा निर्णय दर्गा व्यवस्थापक व ग्रामस्थांनी घेतला आहे. त्याची तयारी देखील करण्यात आली आहे. संपूर्ण परिसराची साफसफाई रंगरंगोटी व सजावट करण्याचे काम सुरू आहे. ५ मार्चला चुना मुबारक ने उर्सची सुरवात होणार असून ६ मार्चला दुपारी दर्गा व्यवस्थापक नूरमहंमद मुजावर, सहव्यवस्थापक मुसववीर मुजावर यांच्या निवास्थानातून संदल मुबारकची मिरवणूक निघणार आहे. फुणगुस मोहल्ला, बाजारपेठ या मार्गाने मिरवणूक सायंकाळी दर्गेत येईल आणि मिरवणुकीचा समारोप होईल. रात्री १० वाजता दर्गा परिसरात नुराणी मैफिल फूनगुस यांचा रातीबचा (मस्तान) कार्यक्रम होणार आहे. ७ ला पारंपरिक पद्धतीने उर्स उत्सव साजरा होणार असून रात्री संदल मुबारकची मिरवणूक निघेल. फुणगुस मोहल्ला तसेच बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक रात्री दर्गेत दाखल होईल. ८ मार्चला दुपारी नियाज (कंदोरी) चा कार्यक्रम होऊन या महोत्सवाची सांगता होणार आहे.