
बौद्ध वधू-वर मेळाव्यास सिंधुदुर्गनगरीत प्रतिसाद
85559
सिंधुदुर्गनगरी ः बौद्ध वधू-वर मेळाव्याची बुध्द वंदनेने सुरुवात करताना मान्यवर.
बौद्ध वधू-वर मेळाव्यास
सिंधुदुर्गनगरीत प्रतिसाद
सावंतवाडी ः बौद्ध समाजातील अनुरूप वधू-वरांचे विवाह सुखकर व्हावेत, या हेतूने निवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेने आयोजित केलेला तिसरा वधू-वर परिचय मेळावा काल (ता. २६) सिंधुदुर्गनगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे उत्साहात झाला. कार्यक्रमाचे अनौपचारिक उद्घाटन संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. धम्मचारी तेजबोधी यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
संस्थेचे सचिव मोहन जाधव यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष अरविंद वळंजू यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन मागील मेळाव्यातून जोडलेल्या लग्नांची माहिती दिली. कार्यक्रमाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी इंटरनेटच्या जमान्यातही मध्यस्थीची गरज कशाप्रकारे असते, हे सांगून याच माध्यमातून समाजातील विवाहेच्छुक तरुण-तरुणींचे संसार जुळविण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. उपाध्यक्ष आनंद धामापूरकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन श्रद्धा कदम यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मिलिंद जाधव, देवगड अध्यक्ष विजय कदम, रुपाली पेंडुरकर आदीदी उपस्थित होते. मेळाव्यात सुमारे ४० वधू-वरांनी सहभागी घेतला. उपक्रमास विशाल वरवडेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
...............
कणकवलीत आज विश्वविक्रम उपक्रम
कुडाळ ः ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल, सोमस्थ अकॅडमी कणकवली आणि सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवलीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून उद्या (ता.२८) कणकवली येथे विश्वविक्रम उपक्रम होणार आहे. यामध्ये १००० पालक व विद्यार्थी यांचा संगीतातील वेगवेगळी वाद्ये एकाच वेळी वाजवण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वाद्यामध्ये (ढोल, ताशा, तबला ,पेटी, ढोलक, मृदुंग, टाळ, हलगी, दिमडी, सिन्थेसायजर आणी इतर कोणतेही वाद्य चालेल) व त्याचबरोबर उर्वरित विद्यार्थी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती तयार करून एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी उद्या आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे येथे ९.३० वाजता उपस्थित रहावे. या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल व यासाठी सर्व सहभागी स्पर्धकांना वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र दिले जाईल. या उपक्रमात सर्व शाळेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यानी व पालकांनी याची नोंद घेऊन यामध्ये जास्तीत जास्त सहभाग दर्शवावा, असे आवाहन कोणीही पालक, विद्यार्थी, कलाकार यामध्ये सहभाग घेऊ शकतो, असे आवाहन ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे आणि सचिव प्रा. हरीभाऊ भिसे यांनी केले आहे.
---
85560
सावंतवाडी ः संत गाडगेबाबा यांना अभिवादन करताना मान्यवर.
संत गाडगेबाबांना सावंतवाडीत वंदन
सावंतवाडी ः येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात नुकतीच संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची जयंती आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. प्रारंभी ॲड. शिवराम कांबळे, आर. जी. चौकेकर, मोहन जाधव, कांता जाधव व संगीता मडुरकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर ॲड. कांबळे व विनोद खोडके यांनी गाडगेबाबांचा जीवन प्रवास स्पष्ट केला. मोहन जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.