
खडीकरण, डांबरीकरणासाठी तोंडवळीवासीयांचे उद्या उपोषण
85639
तोंडवळी ः सुरुचे वन येथील रस्ता.
खडीकरण, डांबरीकरणासाठी
तोंडवळीवासीयांचे उद्या उपोषण
मालवण : तोंडवळी सुरुचे वन येथे वन खात्याच्या क्षेत्रातून जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटर रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण आवश्यक आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास २०१८ पासून पत्रव्यवहार सुरू आहे; मात्र पर्यावरण-वन विभागाकडून आवश्यक असलेली परवानगी घेण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त बनले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तोंडवळी सुरुचे बन येथे बुधवारी (ता. १) बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा तोंडवळी सरपंच, उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम कणकवली यांना दिला आहे.
...............
डिंगणेत आज ‘देवी मळगंगा’
बांदा ः डिंगणे-बांबरवाडी येथील हरिदेव मंदिर येथे उद्या (ता. २८) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी साडेसातला पार्सेकर दशावतार मंडळ, वेंगुर्लेचा ‘देवी मळगंगा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक नितीन सावंत तसेच बांबरवाडी, धनगरवाडी व डिंगणे ग्रामस्थांनी केले आहे.