-युवासेनेच्या गट आणि शहरनिहाय बैठका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-युवासेनेच्या गट आणि शहरनिहाय बैठका
-युवासेनेच्या गट आणि शहरनिहाय बैठका

-युवासेनेच्या गट आणि शहरनिहाय बैठका

sakal_logo
By

rat२७४७.txt

बातमी क्र. ४७ (पान ५ साठी)

युवासेनेच्या गट आणि शहरनिहाय बैठका

चिपळूण, ता. २७ : युवासेना कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते आणि शहर प्रमुख पार्थ जागुष्टे यांनी जिल्हा परिषद गटनिहाय आणि शहरनिहाय बैठकांचे आयोजन करून तालुक्यात युवासेनेचा झंझावात निर्माण केला. रविवारी (ता. २६) रात्री चिपळूण शहरात या दौऱ्याची सांगता झाली.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर चिपळुणातही याचे पडसाद उमटले. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर काही शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केल्याने दोन गट निर्माण झाले. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सातत्याने तालुक्यात वातावरण निर्मिती करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याअनुषंगाने चिपळूण युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात जिल्हापरिषद गट निहाय बैठकांचे आयोजन केले होते. शनिवारी सकाळी पोफळी जिल्हा परिषद गटातून या दौऱ्याला सुरवात झाली. अलोरे, पेढे, सावर्डे, खेर्डी आणि चिपळूण शहरातील काविळतळी येथे युवसैनिकांच्या बैठका घेऊन थेट संवाद साधण्यात आला. दुसऱ्या दिवशी कळंबट, रामपूर, मालदोली या जिल्हा परिषद गटात बैठका घेतल्यानंतर शहरातील पेठमाप, गोवळकोट, उक्ताड याठिकाणी युवसैनिकांशी संवाद साधण्यात आला.