३ हजार टन ऊस जिल्ह्यात शिल्लक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३ हजार टन ऊस 
जिल्ह्यात शिल्लक
३ हजार टन ऊस जिल्ह्यात शिल्लक

३ हजार टन ऊस जिल्ह्यात शिल्लक

sakal_logo
By

85802
वैभववाडी ः जिल्ह्यात अजूनही ऊस तोडणी सुरू आहे.


३ हजार टन ऊस
जिल्ह्यात शिल्लक

नादुरुस्त ‘करुळ’चा फटका; ५ मार्चपूर्वी तोडणी पूर्णतेचा मानस


सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २८ ः जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली असून अजूनही सुमारे ३ हजार टन ऊस तोडणी शिल्लक आहे. जिल्ह्यात सध्या १०५ तोडणी गट कार्यरत आहेत. येत्या ५ मार्चपर्यंत तोडणी पूर्ण करण्याचा कारखाना प्रशासनाचा मानस आहे. दरम्यान, यावर्षी देखील करुळ घाटरस्ता नादुरुस्तीमुळे जिल्ह्यात उशिराने तोडणीला सुरुवात झाली होती.
जिल्ह्यातील बहुतांशी ऊस असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला जातो. या उसाची वाहतूक करुळ घाटमार्गे केली जाते; परंतु हा घाटमार्ग अवजड वाहतुकीस धोकादायक असल्यामुळे यावर्षी देखील जिल्ह्यातील ऊस तोडणीला विलंबाने सुरुवात झाली. २० ऑक्टोबरला यावर्षीच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांत जिल्ह्यातील अवघ्या ४ हजार उसाची तोडणी झाली. तीन ते चार तोडणी गट कार्यरत होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती; परंतु गेल्या दीड महिन्यापासून कारखान्याने तोडणी गटांची संख्या वाढविली. करुळ घाट नादुरुस्त असल्यामुळे भुईबावडा घाटमार्गे ऊस वाहतूक सुरू होती. घाटमाथ्यावरील ऊस तोडणी आटोपल्यामुळे कारखाना प्रशासनाने बहुतांशी तोडणी गट जिल्ह्यात पाठविले. त्यामुळे तोडणीची गती वाढली. जिल्ह्यात सध्या १०५ गटांकडून तोडणी सुरू आहे. गेला महिनाभरात मोठ्या प्रमाणात तोडणी झाली. आतापर्यंत जिल्ह्यातील ४८ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. अजूनही वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि मालवण चार तालुक्यांतील सुमारे ३ हजार टन उसाची तोडणी शिल्लक आहे. ५ मार्चपर्यंत ऊस तोडणी पूर्ण करण्याचा कारखाना प्रशासनाचा प्रयत्न आहे.
..............
चौकट
करुळ घाटरस्ता अद्यापही नादुरुस्त
ऑक्टोबरपासून नादुरुस्त असलेला करुळ घाट पाच महिन्यानंतर अजुनही त्याच स्थितीत आहे. हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे यावर्षी ५० हजार टन उसाची वाहतूक भुईबावडा घाटमार्गाने करण्यात आली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
.............
कोट
जिल्ह्यात सध्या १०५ तोडणी गटांकडून ऊस तोडणी सुरू आहे. आतापर्यंत ४८ हजार टन ऊस तोडणी पूर्ण झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तोडणी पूर्ण होईल. ५ मार्चपूर्वी ऊस तोडणी पूर्ण होईल.
- बी. जी. शेळके, पर्यवेक्षक, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना, असळज
...................