भात बियाणे बँक उभारण्यासाठी प्रयत्नशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात बियाणे बँक उभारण्यासाठी प्रयत्नशील
भात बियाणे बँक उभारण्यासाठी प्रयत्नशील

भात बियाणे बँक उभारण्यासाठी प्रयत्नशील

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२७p२९.jpg-KOP२३L८५८७० देवरूख ः स्वीडनच्या पाहुण्यांसोबत आमदार शेखर निकम, पूजा निकम आदी.


भात बियाणे बँक उभारण्यासाठी प्रयत्नशील
आमदार निकम ; स्वीडनच्या परदेशी पाहुण्यांशी संवाद
देवरूख, ता. २८ः जागतिक तापमान वाढीच्या संकटाला तोंड देण्यासाठी पारंपरिक भात बियाणे टिकविणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेच्या सहकार्याने भात बियाणे बँक उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
संकल्प सोसायटी या स्वयंसेवी संस्थांच्या सृष्टीज्ञान व सह्याद्री संकल्प यांची संगमेश्वर तालुक्यात चाललेल्या कामाची माहिती घेण्यासाठी स्वीडनहून आलेल्या २४ विद्यार्थी व शिक्षक यांच्या समुहाने मारळमधिल वनालिका इंकॉलॉजीकल फार्मला भेट दिली.
आमदार शेखर निकम, माजी सभापती सौ. पूजा निकम, हास्य अभिनेते प्रभाकर मोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांनी मतदारसंघात चाललेल्या सेंद्रीय शेती, वृक्षलागवड, तापमान वाढीचा शेती व बागायतीवर होणारा परिणाम, वारंवार येणारे पूर, सहयाद्री खोऱ्यात कोसळणाऱ्या दरडी याबाबत परदेशी युवकांना माहिती दिली.
सहयाद्री संकल्प सोसायटीचे अध्यक्ष संजीव अणेराव यांनी ३५ वर्षे सह्याद्रीमधील जंगले वाचविण्यासाठी केलेली आंदोलन व वृक्षतोडीमुळे नद्या, वन्यजीव व जैवविविधतेवर होत असलेल्या गंभीर परिणामांची माहिती दिली.
कोकणातील आंबा, काजू, नारळ या फळपिकांवर होत असलेले हवामान बदलाचे गंभीर दुष्परिणामांची माहिती सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रा. डॉ. प्रताप नाईकवडे, सुबोध व मानब अणेराव यानी दिली. फार्मच्या मसाला पिकांच्या सेंद्रीय शेती प्रकल्पाला पाहुण्यानी भेट दिली. सूत्रसंचालन सृष्टीज्ञान संस्थेच्या संगीता खरात यांनी केले. संकल्प सोसायटीने संरक्षित घरट्यांना हॉर्नबिल पक्षांच्या संग्रहालयाला परदेशी पाहुण्यांनी भेट दिली.

अभिनेते प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या खास शैलीत ‘शालू झोका देग मैना’ हे गाणे साभिनय सादर करून परदेशी पाहुण्यांना ठेका धरायला लावला.