Fri, March 31, 2023

भुईबावड्यातील एकावर
अवैध दारूप्रकरणी गुन्हा
भुईबावड्यातील एकावर अवैध दारूप्रकरणी गुन्हा
Published on : 28 February 2023, 1:01 am
भुईबावड्यातील एकावर
अवैध दारूप्रकरणी गुन्हा
वैभववाडी, ता. २८ ः भुईबावडा बाजारपेठेत अवैध दारूविक्री केल्याप्रकरणी प्रवीण पांडुरंग शिनगारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ९ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई आज दुपारी दीडच्या सुमारास झाली.
भुईबावडा बाजारपेठेत अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने छापा टाकला. यावेळी शिनगारे याच्याकडे ९ हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या ९५ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस करीत आहेत.