एसएससी परीक्षा बैठक व्यवस्था पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसएससी परीक्षा बैठक व्यवस्था पूर्ण
एसएससी परीक्षा बैठक व्यवस्था पूर्ण

एसएससी परीक्षा बैठक व्यवस्था पूर्ण

sakal_logo
By

मंडणगडमधील एसएससीची बैठक व्यवस्था
मंडणगड ः एसएससी प्रमाणपत्र परीक्षा सन २०२३ या शैक्षणिक वर्षासाठी केंद्र क्र. ७००२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कला, वाणिज्य, आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड या परीक्षाकेंद्रावरील परीक्षेची बैठक व्यवस्था पूर्ण झालेली आहे. या केंद्रावर २ ते २५ मार्च या कालावधीत बोर्डाचे एकूण १० पेपर होणार आहेत. मंडणगड तालुक्यातील एकूण ३४२ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या १५ वर्गखोल्यांची व्यवस्था हायस्कूल इमारतीमध्ये करण्यात आली आहे. या केंद्रावरील परीक्षेच्या वेळापत्रकानुसार कामकाज केंद्र संचालक ए. बी. हुल्लोळी, उपकेंद्र संचालक एस. आर. बैकर पाहत आहेत तसेच स्टेशनरी सुपरवायझर किशोर कासारे, लिपिक म्हणून खताते काम पाहत आहेत. मंडणगड तालुक्यातील सर्व एसएससी प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होणारे परीक्षार्थी व त्यांचे पालक कृपया नोंद घ्यावी, ही विनंती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.