ओमानमधुन 27 वर्षानंतर इक्बाल पावसकर मायदेशी

ओमानमधुन 27 वर्षानंतर इक्बाल पावसकर मायदेशी

Published on

rat२८३९.txt

बातमी क्र..३९ ( पान ३ साठी, फ्लायर)

फोटो ओळी
-rat२८p५३.jpg ः
८५९३४
लांजा ः मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अकिल नाईक आपल्या टीमसोबत.
----
ओमानमधून २७ वर्षानंतर इक्बाल पावसकर मायदेशी

अकिल नाईकांच्या प्रयत्नाना यश ; चित्रपटाला साजेशी कहाणी

लांजा, ता. १ ः एखादी व्यक्ती परदेशात कामाला गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटांमुळे मायदेशी परतण्याचे सर्व दोर कापले जातात आणि आपला मृत्यूही परदेशात बेवारस होणार याची खूणगाठ ती व्यक्ती मनाशी बांधते; मात्र कर्मधर्म संयोगाने त्याच्या देशातील काही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळते आणि त्यांच्या मदतीने ती व्यक्ती तब्बल २७ वर्षानंतर पुन्हा आपल्या मायदेशी भारतात परतते. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटणारी ही सत्यकथा आहे. रत्नागिरीकरासाठी देवदूत ठरणारी संस्था आहे लांजातील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी आणि तिचे कार्याध्यक्ष अकिल नाईक व सहकारी.
कार्याध्यक्ष अकिल नाईक यांनी २७ वर्षे ओमान देशात अडकून पडलेल्या रत्नागिरी येथील इक्बाल पावसकर यांची सुटका करून त्यांना मायदेशी आणले आहे. अकिल नाईक हे नोकरीनिमित्ताने परदेशात काम करत आहेत. काही महिन्यांपूर्वी अकिल हे ओमानला गेले होते. त्यांना इक्बाल हसन पावसकर हे बेपत्ता असल्याची माहिती अन त्यांचा फोटो व्हॉटस्अ‍ॅपवर दिसला. अकिल नाईक व मुस्लिम वेल्फेअर सोसायटीने त्या व्यक्तीच्या शोधकार्याला सुरवात केली.
ही व्यक्ती तेथील एका हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने अकिल यांनी तिथे धाव घेतली. त्यानंतर माहिती घेण्यात आली. तिथे इक्बाल पावसकर यांची चौकशी केली. ते तिथे सापडले; मात्र त्याच्याकडे ओळखपत्राचा कोणताही पुरावा नव्हता. आधारकार्ड, पॅनकार्ड, अशी ओळखपत्र असणे आवश्यक होते; मात्र ती नसल्यामुळे त्याची ओळख पटवण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली. इक्बाल पावसकर याचे हॉस्पिटलचे जवळपास चार ते पाच लाखांचे बिल झाले होते. हे बिल मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी मोफत करून घेतले. तिथून त्यांची सुटका केल्यानंतर पुढे त्यांना भारतात आणायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला. इक्बाल हसन पावसकर यांच्याकडे भारतात येण्यासाठी कागदपत्रे नसल्यामुळे पासपोर्ट काढणे कठीण झाले होते. ते जिथे काम करत होते तेथील लेबर डिपार्टमेंटला एक माणूस पोहोचला. त्याने मॅनेजरला विनंती करून पासपोर्टविषयी माहिती दिली. त्यानंतर मॅनेजरनेही पासपोर्टसाठी मदत केली. अखेर इक्बाल पावसकर यांनी आपल्या मायदेशी प्रवेश केला.
इक्बाल पावसकर यांची कहाणी खूप दुःखाची आहे. गेली २७ वर्षे तुरुंगवास भोगल्यासारखा त्यांचा जीवनप्रवास अखिल नाईक आणि मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून पूर्णत्वास आणला. गेल्या २७ वर्षाचा प्रवास सांगताना इक्बाल पावसकर यांचे डोळे पाण्याने भरले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com