-राजापूर अर्बनने गाळ उपशासाठी दिले 51 हजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-राजापूर अर्बनने गाळ उपशासाठी दिले 51 हजार
-राजापूर अर्बनने गाळ उपशासाठी दिले 51 हजार

-राजापूर अर्बनने गाळ उपशासाठी दिले 51 हजार

sakal_logo
By

rat०१४.txt

बातमी क्र..४ (टुडे पान १ साठी)

फोटो ओळी
-rat१p१६.jpg ः
८६०९५
राजापूर ः मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांच्याकडे गाळ उपशाच्या उपक्रमासाठीचा धनादेश देताना राजापूर अर्बन बँकेचे चेअरमन हनिफ काझी, व्हाइस चेअरमन प्रसाद मोहरकर आदी.
---

राजापूर अर्बनकडून गाळ उपशासाठी ५१ हजार रुपये

राजापूर, ता. १ ः महसूल विभाग आणि नगर पालिकेचा पुढाकार आणि लोकसहभागातून शहरातून वाहणाऱ्‍या कोदवली नदीपात्रातील गाळउपशाचे काम सुरू आहे. या कामासाठी लोकवर्गणीतून निधीची उभारणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना राजापूर अर्बन बॅंकेने तब्बल ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. सहकार क्षेत्रामध्ये आपल्या नावलौकिकतेचा ठसा उमटवणाऱ्‍या राजापूर अर्बन बँकेने गाळ उपशाला आर्थिक मदत करून जोपासलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध झाल्यानंतर लोकसहभागातूनही मोठ्या प्रमाणात निधीची उभारणी करण्यात आली. त्याचवेळी नाम फाउंडेशनकडून यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कामासाठी अद्यापही निधीची आवश्यकता असून या निधीच्या उभारणीचे काम अद्यापही सुरू आहे. राजापूर अर्बन बँकनेही सामाजिक बांधिलकी जपत ५१ हजाराची आर्थिक मदत दिली आहे. पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांच्याकडे गाळ उपशाच्या उपक्रमासाठीचा धनादेश देताना राजापूर अर्बन बँकेचे चेअरमन हनिफ काझी, व्हाइस चेअरमन प्रसाद मोहरकर, संचालक अनामिका जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, ओएसडी प्रसन्न मालपेकर, रमेश काळे, प्रसन्न खांबे, शोएब कुडाळकर आदी उपस्थित होते.