उपपरिसराच्या एनएसएस विभागाकडून ’शिळ’ दत्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपपरिसराच्या एनएसएस विभागाकडून ’शिळ’ दत्तक
उपपरिसराच्या एनएसएस विभागाकडून ’शिळ’ दत्तक

उपपरिसराच्या एनएसएस विभागाकडून ’शिळ’ दत्तक

sakal_logo
By

rat०१६.TXT

बातमी क्र. ६ (टुडे पान १ साठी)

फोटो ओळी
- rat१p२५.jpg-
८६११४
रत्नागिरी ः एनएसएसच्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगीत शिळ उपसरपंच संचिता सनगरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना किशोर सुखटणकर.
---
उपपरिसराच्या एनएसएस विभागाकडून ’शिळ’ दत्तक

जल व वन संवर्धनावर भर ; निवासी शिबिरात ४१ विद्यार्थी सहभागी

रत्नागिरी, ता. १ ः मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून शिळची दत्तक गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. या गावात नुकतेच निवासी शिबिर घेण्यात आले. स्वच्छता जनजागृतीसह जल व संवर्धनावर भर देण्यात आला होता.
रत्नागिरी उपपरिसराच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिराचे उद्घाटन मिरजोळे शीळ गावातील ग्रामपंचायत सभागृहात झाले. यावेळी मिरजोळे शिळ उपसरपंच संचिता सनगरे, उपपरिसराचे संचालक किशोर सुखटणकर, प्रमुख पाहुणे अतुल पित्रे, फिनोलेक्स कॉलेजचे प्रा. मिलिंद तगारे, माजी उपसरपंच राहुल पवार, ग्रामपंचायत सदस्य सुरज मालगुंडकर, विक्रम जोयशी, प्रा. पांडुरंग पाटील उपस्थित होते. उपपरिसरामार्फत राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शिळची दत्तक गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवासी शिबिरात रत्नागिरी उपपरिसराचे एकुण ४१ विद्यार्थी सहभागी झाले. या शिबिरात स्वच्छता जनजागृती, जलसंवर्धन जनजागृती, वनसंवर्धन सर्वेक्षण, व्यक्तीमत्व विकास, जनजागृतीपर पथनाट्य, व्याख्याने, चर्चासत्र आणि जैवविविधतेची नोंदी करणे असे विविध उपक्रम या निमित्ताने राबवण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपपरिसराचे संचालक किशोर सुखटणकर यांनी केले. सूत्रसंचालन शिबिरार्थी साक्षी चाळके हिने केले. सरपंच गजानन गुरव यांच यावेळी आभार मानण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय गुरव, प्रा. सोनाली मेस्त्री तसेच शिरीन लिमये, सतीश मांजरे, गिरीश कदम, डॉ. प्रशांत दांड़गे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.