स्थानिक पातळीवरचाच आहार हितकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानिक पातळीवरचाच आहार हितकारक
स्थानिक पातळीवरचाच आहार हितकारक

स्थानिक पातळीवरचाच आहार हितकारक

sakal_logo
By

kan12.jpg
86125
कणकवली : येथील महाविद्यालयात डॉ. सुविनय दामले यांनी मार्गदर्शन केले.
--------------
स्थानिक पातळीवरचाच आहार हितकारक
डॉ. सुविनय दामले : कणकवली कॉलेजमध्ये मार्गदर्शन
कणकवली, ता. २ : सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण जागतिक पातळीवरचा विचार करत असलो तरी स्थानिक पातळीवरचाच आहार आपल्‍यासाठी हितकारक आहे, असे प्रतिपादन डॉ. सुविनय दामले यांनी केले.
कणकवली कॉलेजमध्ये राष्‍ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम झाला. यात डॉ. दामले यांनी ‘आहारातील भरडधान्यांचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य प्रा. युवराज महालींगे, विज्ञान मंडळाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण गावडे, प्रा. डॉ. शामराव दिसले, मंगलदास कांबळे, प्रा. प्रशांत अमृते आदी उपस्थित होते.
डॉ. दामले म्‍हणाले, आपण आधुनिक जीवनशैली अंगिकारत असलो तरी आहाराकडे मात्र कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. आपल्‍या आजूबाजुला उपलब्‍ध होणारी नाचणी, ज्वारी, बाजरी आदींचा वापर रोजच्या आहारात व्हायला हवा. तसेच आहारात विविधता असावी.
ते म्‍हणाले, मिश्र भरडधान्य ही पचनास जड असतात त्यामुळे भरडधान्य ही स्वतंत्र वापरावीत. त्यामध्ये इतर धान्य मिसळू नयेत. आहार हीच निरोगी शरीराची गुरूकिल्ली आहे.
विज्ञान दिनाच्या औचित्‍यावर प्रश्नमंजुषा, पोस्टर प्रेसेंटेशन, मॉडेल प्रेसेंटेशन, पॉवर पॉइंट प्रेसेंटेशन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा झाल्‍या. तर २४ विद्यार्थ्यांनी संशोधन लेख सादर केले. सर्व स्पर्धांमध्ये एकूण २०२ विद्यार्थी सहभागी झाले होते. हर्षदा प्रवीण कुबल या विद्यार्थिनीला या वर्षीची जनरल चँम्पियनशिप मिळाली. सूत्रसंचालन सायमा पटेल, सानिका कराळे, मुस्कान शेख, सेजल परब, किमया हिंदळेकर यांनी केले. प्रा. प्रशांत अमृते यांनी आभार मानले.